विवोने गेल्या महिन्यात आपला दमदार T3 Pro 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. ज्याची सेल 3 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि इतर रिटेल आऊटलेटवर सुरु झाली आहे. तसेच पहिली विक्री ग्राहकांना बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर सारख्या फायद्याची सुविधा दिली जात आहे. चला, पुढे तुम्हाला Vivo T3 Pro 5G च्या सर्व व्हेरिएंटची किंमत, स्पेसिफिकेशन आणि ऑफरची माहिती देत आहोत.
Vivo T3 Pro 5G किंमत आणि ऑफर
- Vivo T3 Pro 5G ची किंमत 8GB+128GB व्हेरिएंटच्या बेस मॉडेलसाठी 24,999 रुपये आहे. याचा दुसरा 8GB + 256GB ऑप्शन 26,999 रुपयांमध्ये येतो.
- हा डिव्हाईस फ्लिपकार्ट, विवो इंडिया वेबसाईट आणि इतर रिटेल स्टोरवर उपलब्ध होईल.
- फोनची विक्री 3 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता सुरु होईल.
- कंपनी Vivo T3 Pro 5G वर लाँच डिस्काऊंटची ऑफर केली जात आहे.
- HDFC बँक आणि ICICI बँक कार्ड युजर्सना फ्लॅट 3,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट मिळेल.
- फ्लिपकार्ट अॅक्सिस क्रेडिट कार्ड कॅशबॅक ऑफरवर 5 टक्के अतिरिक्त सूट दिली जाईल.
- बँक ऑफर सह 3,000 रुपये पर्यंत एक्सचेंज बोनस आणि 3 ते 6 महिने नो कॉस्ट ईएमआयची ऑफर पण आहे.
- कलर ऑप्शन पाहता विवो टी 3 प्रो 5 जी दोन कलर ऑप्शनमध्ये येतो. ज्यात सॅंडस्टोन ऑरेंज आणि एमरल्ड ग्रीनचा समावेश आहे.
बेस मॉडेल लाँच किंमत : 24,999 रुपये
बँक ऑफर किंमत : 21,999 रुपये
टॉप मॉडेल लाँच किंमत : 26,999 रुपये
बँक ऑफर किंमत : 23,999 रुपये
Vivo T3 Pro 5G चे स्पेसिफिकेशन
- 6.77 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले
- स्नॅपड्रॅगन 7 जेन 3
- 8 जीबी रॅम +256GB स्टोरेज
- 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
- 16MP चा फ्रंट कॅमेरा
- 5,500 एमएएच बॅटरी
- 80W फास्ट चार्जिंग
- आयपी 64 रेटिंग
डिस्प्ले: Vivo T3 Pro 5G स्मार्टफोन 3 डी कर्व्ड 6.77 इंचाची अॅमोलेड स्क्रीन असलेला आहे. या डिस्प्लेवर 120Hz रिफ्रेश रेट, 100% DCI-P3 कलर गमट, 4500 निट्स पीक ब्राईटनेस आणि 387 PPI पिक्सल डेंसिटी मिळते.
प्रोसेसर: मोबाईलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. हा 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे. याचा AuTuTu स्कोर 812119 आहे जो या सेगमेंटमध्ये जबरदस्त आहे. तसेच, ग्राफिक्ससाठी एड्रेनो 720 जीपीयू आहे.
स्टोरेज आणि रॅम: डिव्हाईसमध्ये 8GB LPDDR 4X रॅम आणि 256 जीबी पर्यंत UFS 2.2 इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. यात एक्सटेंडेड 8GB रॅम पण आहे. म्हणजे तुम्ही एकूण 16GB पर्यंतचा पावरचा उपयोग करू शकता.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी मोबाईलमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे. ज्यात OIS टेक्नॉलॉजीसह 50 मेगापिक्सल Sony IMX882 प्रायमरी आणि 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
बॅटरी: Vivo T3 Pro 5G मध्ये 5,500 एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. याला चार्ज करण्यासाठी 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
ऑपरेटिंग सिस्टम: Vivo T3 Pro स्मार्टफोन अँड्रॉईड 14 आधारित फनटच ओएस 14 वर आधारित ठेवला गेला आहे. त्याचबरोबर 2 वर्षाचे अँड्रॉईड अपडेट आणि 3 वर्षाचे सुरक्षा अपडेट पण मिळेल.
इतर: फोनला पाणी आणि धूळीपासून वाचणारी आयपी 64 रेटिंग प्राप्त आहे. यात ड्युअल स्टीरियो स्पिकर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि वेट टच टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच लिक्विड कूलिंग सिस्टम, अल्ट्रा गेम मोड, 4D गेम वाईब्रेशन, वायफाय, ड्युअल 5 जी, ब्लूटूथ सारखे अनेक फिचर्स जोडले गेले आहेत.














