एक्सक्लूसिव : लॉन्चच्या आधी बघा कसा दिसेल वीवो वी15 प्रो, इथे आहे फोनची रियल ईमेज

91मोबाईल्स ने गेल्याच आठवड्यात वीवोच्या आगामी स्मार्टफोन वी15 प्रो च्या फुल स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली होती. आमच्या एक्सक्लूसिव बातमीत आम्ही वी15 प्रो च्या स्पेसिफिकेशन्स सोबत याच्या डिजाईनचा पण खुलासा केला होता तसेच सांगितले होते कि 15 फेब्रुवारी पासून वी15 प्रो प्री-बुकिंग साठी उपलब्ध होणार आहे जो 20 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होईल. तर आज​ लॉन्चच्या आधीच आम्ही या स्मार्टफोनची रियल ईमेज पण घेऊन आलो आहोत. वी15 प्रो चा फोटो बघून तुम्ही फोन बाजारात येण्याआधीच बघू शकाल कि कसा दिसेल हा स्मार्टफोन.

वीवो वी15 प्रो काही दिवसांनी भारतात लॉन्च होईल. आज आम्ही आमच्या रिपोर्ट मध्ये वी15 प्रो च्या बॅक पॅनलचा फोटो घेऊन आलो आहोत. वीवो वी15 प्रो चा बॅक पॅनल खूप ग्लॉसी आहे. वी11 प्रो प्रमाणे हा फोन ग्रेडिएंट लुक सह सादर केला जाईल. फोनचा बॅक पॅनल चमकदार आहे जो आकर्षक दिसत आहे. वी15 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.

फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये कॅमेरा सेटअप आहे. दोन कॅमेरा सेंसर फ्लॅश लाईटच्या खाली आहेत तर एक सेंसर फ्लॅशच्या वर आहे. रियर कॅमेरा सेटअप वर ‘एआई ट्रिपल कॅमेरा’ लिहिण्यात आले आहे. फोनच्या उजविकडील पॅनल वर वॉल्यूम रॉकर दिसला आहे तसेच डाव्या पॅनल वर पावर बटण आहे. रियर कॅमेऱ्याच्या वरच्या बाजूला थोडा बॉडी स्पॉट फोटो मध्ये दिसत आहे. तिथूनच फोनचा पॉप अप सेल्फी कॅमेरा बाहेर येईल.

वीवो वी15 प्रो ची सर्वात मोठी खासियत फोनचा कॅमेरा सेग्मेंट असेल. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल तसेच हा फोन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. वीवो 15 प्रो मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो फोन बॉडी मध्ये असेल. सेल्फीची कमांड देताच हा सेंसर पॉप अप कॅमेऱ्याच्या स्वरूपात बाहेर येईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वरील ट्रिपल कॅमेरा सेटअप मध्ये 48-मेगापिक्सल (12 X 4) चा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच 5-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर असेल.

वी15 प्रो मध्ये फुल व्यू डिस्प्ले देण्यात येईल जो सुपर एमोलेड असेल. या डिस्प्लेच्या खालच्या भागात अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. वी15 प्रो 6जीबी रॅम सह बाजारात येईल तसेच फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाईल. वीवो आपला हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह लॉन्च करेल. वीवो येत्या 20 फेब्रुवारीला वी15 प्रो भारतात सादर करणार आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती लवकरच तुम्हाला दिली जाईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here