31 दिवसांचे बेस्ट Plan, जास्त डेटासह कॉलिंग अगदी मोफत

भारतातील मोबाइल सेवा देणारी सरकारी कंपनी BSNL आपल्या स्वस्त आणि दीर्घ रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. तसे तर कंपनीकडे अनेक प्लॅन्स आहेत ज्यात 30 Days Validity मिळते परंतु अलीकडेच बीएसएनएलनं दोन नवीन मंथली रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत जे खूप आकर्षक आहेत. Bharat Sanchar Nigam Limited नं 228 रुपये आणि 239 रुपयांचे दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत जे थेट Reliance Jio आणि Airtel च्या रिचार्ज प्लॅन्सना टक्कर देतात. रिचार्ज टॅरिफमध्ये तुम्हाला मंथली व्हॅल्यू मिळते जी खूप चांगली आहे.

BSNL 1 Month Validity Recharge

BSNL Rs 228 Prepaid Plan

BSNL Rs 239 Prepaid Plan

BSNL चा 228 रुपयांचा प्लॅन

BSNL चा 228 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन मंथली वॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 2GB डेली डेटाचा फायदा मिळतो, हा डेटा संपल्यावर देखील ग्राहकांना 80 Kbps वर डेटा वापरता येईल. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये 100 SMS रोज मिळतील. बीएसएनएल या प्लॅनसह ग्राहकांसाठी प्रोग्रेसिव वेब अ‍ॅपवर चॅलेंज एरिना मोबाइल गेमिंग सर्व्हिसचा लाभ देखील देत आहे. हे देखील वाचा: एक नव्हे दोन वर्षांची वॉरंटी! फ्री Nokia Wired Buds सह Nokia G60 5G भारतात लाँच; इतकी आहे किंमत

BSNL चा 239 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 239 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळते. तसेच युजर्सना 100 एसएमएस/रोज मिळतात आणि तुम्हाला 2GB डेली डेटा देखील दिला जातो. म्हणजे 30 दिवसांमध्ये 60GB डेटा मिळेल. 2GB डेटा संपल्यावर इंटरनेटचा स्पीड कमी होऊन 80 Kbps होईल. या प्लॅनसह गेमिंग बेनिफिट्स देखील देण्यात आले आहेत, त्याचबरोबर रोमिंग सर्व्हिस देखील फ्री आहे. महीना 30 दिवसांचा असेल तर 30 दिवस आणि जर 31 दिवसांचा असेल तर 31 दिवस हा प्लॅन वैध राहतो.

BSNL 1 महिना वैधता असलेले रिचार्ज

या प्लॅनची खासियत म्हणजे यात फिक्स वॅलिडिटी मिळत नाही. म्हणजे या प्लॅनमध्ये दिवस ठरलेले नाहीत, उलट जेवढ्या दिवसांचा महीना असेल, हा प्लॅन तेवढे दिवस चालेल. जर महिन्यात 30 दिवस असतील तर हा BSNL Plan 30 दिवसांची वॅलिडिटी देईल आणि 31 दिवसांच्या महिन्यात या प्लॅनमध्ये 31 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. थोडक्यात महिन्याच्या ज्या तारखेला बीएसएनएलचा हा रिचार्ज केला जाईल, पुढील महिन्यात त्या तारखेपर्यंत हा प्लॅन पुरेल. हे देखील वाचा: Upcoming smartphones November 2022: वनप्लसच्या परवडणाऱ्या स्मार्टफोनसह ‘हे’ हँडसेट येत आहेत या महिन्यात, पाहा यादी

Note: बीएसएनएलचे प्लॅन देशात वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळ्या बेनिफिट्ससह येतात. त्यामुळे रिचार्ज करण्याआधी प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची माहिती कंपनीच्या साइट या बीएसएनएल कस्टमर केयरकडून मिळवावी.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here