सॅमसंगच्या घडी होणाऱ्या फोनचे नाव असेल गॅलेक्सी फोल्ड, असतील हि वैशिष्ट्ये

साउथ कोरियन कंपनी सॅमसंग आज म्हणजे 20 फेब्रुवारीला आपल्या गॅलेक्सी एस10 सीरीजचे नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. सॅन फ्रँसिस्को मध्ये आयोजित गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंट मध्ये गॅलेक्सी एस10+, गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10ई स्मार्टफोन्स लॉन्च केले जातील. तसेच रिपोर्ट्स नुसार कंपनी गॅलेक्सी एस10 सीरीज व्यतिरिक्त आपला पहिला फोल्डेबल फोन पण लॉन्च करेल.

आता लॉन्चच्या थोडावेळ आधीच या फोल्डेबल डिवाइसचे ऑफिशल नाव लीक झाले आहे. पॉप्युलर टिपस्टर इवान ब्लास ने ट्वीट करून सांगितले कि कंपनीच्या या फोल्डेबल फोनचे ऑफिशल नाव ‘सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड’ असेल. आतापर्यंत आलेल्या रिपोर्ट्स मध्ये या फोल्डेबल फोनला गॅलेक्सी एफ, गॅलेक्सी फ्लेक्स आणि गॅलेक्सी एक्स अशी नावे देण्यात आली होती.

डुअल कॅमेरा आणि वाटर ड्रॉप नॉच सह लॉन्च झाला वीवोचा स्वस्तातला फोन यू1

सॅन फ्रँसिस्को मध्ये होणारा इवेंट आज संध्यकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार 21 फेब्रुवारी 12:30 वाजता) सुरु होईल. इतकेच तर गॅलेक्सी एस10 सीरीजच्या या फोन्सची प्री-बुकिंग पण आज रात्री सुरु होईल.

गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंटची लाइव स्ट्रीमिंग सॅमसंगच्या फेसबुक आणि ट्विटर पेज सोबत यूट्यूब चॅनेलवर केली जाईल. लॉन्चच्या आधी या सर्व फोन्स बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत.

48एपमी ट्रिपल कॅमेरा, 32एमपी पॉपअप सेल्फी, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला वीवो वी15 प्रो

गॅलेक्सी एस10 सीरीज मध्ये असू शकतात हे फीचर्स
समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस10, एस10+, एस10ई मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर असेल. तसेच गॅलेक्सी एस10 चे 6जीबी/8जीबी रॅम सोबत 128जीबी/512जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट असतील. गॅलेक्सी एस10+ पाहता याचे 6जीबी/8जीबी/12जीबी रॅम सह 128जीबी/512जीबी आणि 1टीबी स्टोरेज वेरिएंट सादर केले जाऊ शकतात. शेवटी बोलूया गॅलेक्सी एस10 सीरीजच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी एस10ई बद्दल, यात 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here