फक्त 6,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Infinix Smart 3 Plus

टेक कंपनी इनफिनिक्स ने गेल्या वर्षी भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन इनफिनिक्स स्मार्ट 2 लॉन्च केला होता जो 5,999 रुपयांच्या सुरवातीच्या किंमतीत सेल साठी उपलब्धझाला होता. तर आज हीच सीरीज अजून वाढवत कंपनीने अजून एक नवीन स्मार्टफोन Infinix Smart 3 Plus लॉन्च केला आहे. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन इनफिनिक्स द्वारा 6,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 30 एप्रिल पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

डिजाईन
Infinix Smart 3 Plus कंपनीने ट्रेंड मधील वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला आहे. हा फोन ग्लॉस यूनिबॉडी डिजाईन वर बनवण्यात आला आहे. इनफिनिक्स स्मार्ट 3 प्लस बेजल ​लेस डिस्प्ले वर बनलेला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप छोटीशी नॉच देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

फोनच्या बॅक पॅनल वर मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे ​तसेच सेंसरच्या खाली Infinix ची ब्रांडिग आहे. फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबत 3.5एमएम जॅक पण आहे. तसेच वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत. फोनच्या डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

स्पेसिफिकेशन्स
Infinix Smart 3 Plus 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2.5डी ग्लासने प्रोटेक्टेड 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.21-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9.0 पाई वर सादर केला आहे जो एक्सओएस 5 वर आधारित आहे. तसेच प्रोसेसिंग साठी Infinix Smart 3 Plus मध्ये 2.0 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रियर कॅमेरा सेटअप मध्ये दुसरा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे तर तिसरा सेंसर कंपनीने लो लाईट सेंसरच्या रुपयात दिला आहे. तर सेल्फी साठी Smart 3 Plus एफ/2.0 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: Jio 4जी डाउनलोड स्पीड मध्ये पुन्हा अव्वल, बघा दुसऱ्या कंपन्यांची हालत

Infinix Smart 3 Plus कंपनीने 2जीबी रॅम वर सादर ​केला आहे. हा फोन 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Infinix Smart 3 Plus मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here