चीनी मोबाईल फोन निर्माता कंपनी शाओमी ने भारतातच नव्हे तर जगभरात फॅन फॉलोइंग बनवली आहे. शाओमी जगभरात बजेट पासून हाई बजेट स्मार्टफोन सादर केले आहेत जे शानदार स्पेसिफिकेशन्स व फीचर्स सह येतात. गेल्यावर्षी कंपनीच्या सहकारी कंपनी ब्लॅक शार्क ने गेमिंग लर्वस साठी आपले दोन स्मार्टफोन ब्लॅक शार्क आणि ब्लॅक शार्क हीलो सादर केले होते. आता कंपनी आपली गेमिंग सेंट्रिक ब्लॅक शार्क लाइनअप वाढवत या सीरीज मध्ये नवीन फोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे.
ब्लॅक शार्क ने आपला पुढील गेमिंग स्मार्टफोन ब्लॅक शार्क 2 चा टीजर जारी केला आहे. टीजर मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन लिक्विड कूल 3.0 टेक्नोलॉजी सह येईल जी एक थर्मल मॅनेजमेंट सिस्टम आहे. तसेच कंपनी ने ब्लॅक शार्क 2 ची लॉन्च तारीख पण घोषित केली आहे. चीनी सोशल साइट वेइबो वर एक पोस्टर शेयर केला गेला आहे, ज्यानुसार ब्लॅक शार्क 2 चीनी मार्केट मध्ये 18 मार्चला लॉन्च केला जाईल. तसेच स्मार्टफोन अंतूतू वर लिस्ट केला गेला आहे ज्यातून हॅन्डसेट मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर आणि एंड्रॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम असल्याची माहिती मिळाली आहे.
कंपनी द्वारा जारी करण्यात आलेल्या टीजर पोस्टर मध्ये वरच्या बाजूला “ब्लॅक शार्क 2” चे नाव लिहिण्यात आले आहे आणि याखाली 18 मार्चच्या लॉन्च तारखेचा उल्लेख आहे. कंपनी ने ऑफिशियली ब्लॅक शार्क 2 च्या स्पेसिफिकेशनचा खुलासा केला नाही. पण एवढे निश्चित आहे कि डिवाइस मध्ये हीट मॅनेजमेंट साठी लिक्विड कूल 3.0 टेक्नोलॉजीचा वापर केला जाईल. तसेच ब्लॅक शार्कचा हा फोन अलीकडेच गीकबेंच साइट वर 12जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर सह लिस्ट केला गेला होता.
हे पण वाचा: शाओमी मी ए2 ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी आणि रेडमी नोट 6 प्रो पण झाला स्वस्त
तसेच काही दिवसांपूर्वी कंपनी द्वारा मीडियाला पाठवण्यात आलेल्या प्रेस नोट मधून संकेत मिळाले होते कि गेमिंग लाइनअप मध्ये गेल्यावर्षी लॉन्च केल्या गेलेल्या फोन्स पैकी एक म्हणजे ब्लॅक शार्क हीलो भारतीय बाजारात येईल. प्रेस नोट मध्ये लिहिण्यात आले होते “एक मोठा हॅलो तुम्हाला ब्लॅक शार्कच्या भारतीय टीम कडून!” अजूनतरी शाओमी ने याचा खुलासा केला नाही कि भारतात ब्लॅक शार्क सादर केला की ब्लॅक शार्क हीलो.
ब्लॅक शार्क हीलो चे स्पेसिपिकेशन्स
ब्लॅक शार्क हीलो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.01-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे. ब्लॅक शार्क हीलो एंडरॉयड 9 पाई सह सादर करण्यात आला आहे जी कंपनीच्या लेटेस्ट मीयूआई सह चालतो. फोन मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच विजुअल क्वॉलिटी आणि ग्राफिक्स चांगले करण्यासाठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू देण्यात आला आहे.
हे पण वाचा: वीवोने आणला वाटर ड्रॉप नॉच असलेला स्वस्त फोन, सॅमसंग गॅलेक्सी एम10 ला मिळेल चांगलीच टक्कर
शाओमी ने आपला फोन 3 वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. ब्लॅक शार्क हीलो 10जीबी च्या पावरफुल रॅमला सपोर्ट करतो तसेच यात 256जीबी इंटरनल स्टोरेज देनाय्त आली आहे. तर दुसरा वेरिएंट 8जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच तिसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सोबत 128जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ब्लॅक शार्क हीलो डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 20-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 24-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
ब्लॅक शार्क हीलो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल बँड वाईफाई, ब्लूटूथ 5.0 व जीपीएस सारखे बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. तसेच पावर बॅकअप साठी यात फास्ट चार्जिंग सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
















