शाओमी मी ए2 ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी आणि रेडमी नोट 6 प्रो पण झाला स्वस्त

शाओमी ने यावर्षीच्या सुरवातीला आपल्या अनेक स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या होत्या, ज्यात गेल्यावर्षी लॉन्च झालेले स्मार्टफोन्स होते. यावेळी कंपनीने पुन्हा आपल्या दोन नवीन स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. जर तुम्ही पण शाओमी फॅन असाल आणि नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शाओमी मी ए2 आणि रेडमी नोट 6 प्रो विकत घेऊ शकता. या दोन्ही फोन्सच्या किंमतीत क्रमश: 2,000 व 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

मी ए2 च्या किंमतीच्या कपातीबद्दल शाओमी इंडियाचे एमडी आणि ग्लोबल वीपी मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटर हँडल वर एक ट्विट केले आहे. तर91मोबाईल्सला रेडमी नोट 6 प्रो च्या कमी झालेल्या किंमतीची माहिती रिटेल सोर्स कडून मिळाली आहे. कपातीनंतर दोन्ही डिवाइसचे 4जीबी रॅम 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. हि कपात कायमची करण्यात आली आहे.

शाओमी मी ए2
शानदार प्रोसेसर सह कंपनी ने हा एंडरॉयड वन इंटीग्रेशन सह सादर केला आहे जो दोन वर्षांपर्यंत ओएस अपडेट देतो. अन्य स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेली 5.99-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन आहे जी गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टड आहे. क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आधारित या डिवाइस मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मी ए2 मध्ये 20-मेगा​पिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे पण वाचा: वीवोने आणला वाटर ड्रॉप नॉच असलेला स्वस्त फोन, सॅमसंग गॅलेक्सी एम10 ला मिळेल चांगलीच टक्कर

शाओमी रेडमी नोट 6 प्रो
हा 19:9 आस्पेक्ट ​रेशियो वाल्या 6.26-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट आधारित या फोन मध्ये 6जीबी आणि 4जीबी रॅम देण्यात आला आहे. सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोटोग्राफी साठी एफ/1.9 अपर्चर असलेला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. तसेच सेल्फी साठी 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा ​डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here