गेल्या काही महिन्यात सॅमसंग गॅलेक्सी एस10, शाओमी रेडमी नोट 7 प्रो, वीवो वी15 प्रो आणि ओपो एफ11 प्रो सारखे मोबाईल फोन भारतात लॉन्च झाले. पंरतु हे इथेच थांबणार नाही. उलट या महिन्यात अनेक फोन येणार आहेत. भारतीय बाजारात अनेक मोठे फोन येणार आहेत ज्यात विश्वासू नोकिया पासून, परफेक्ट सॅमसंग आणि पॉप्युलॅरिटी किंग शाओमीचा समावेश आहे. तसेच तम्ही काही अश्या फोनची नावे पण ऐकल जे नवीन आहेत. पुढे आम्ही या महिन्यात लॉन्च होणाऱ्या अशाच 9 दमदार फोनची माहिती दिली आहे.
फेब्रवारी मध्ये झालेल्या मोबाईल वर्ल्ड कॉन्ग्रेस मध्ये एचएमडी ग्लोबल ने पाच कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योर व्यू सादर केला होता. तेव्हा कंपनी ने माहिती दिली होती कि हा फोन भारतात पण लॉन्च होईल. खास बाब अशी कि या महिन्यात कंपनी हा सादर करू शकते. हा जगातील पहिला फोन आहे ज्यात रियर पाच कॅमेरा देण्यात आले आहेत. फोन मध्ये 12-मेगापिक्सलचे पाच कॅमेरा आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहेत तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इतर स्पेसिफिकेशन्स पाहता नोकिया 9 प्योरव्यू 18:9 आस्पेक्ट रेशियो वाले बेजल लेस डिजाईन वर सादर करण्यात आला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो.
गेल्या महिन्यात वीवो ने चीन मध्ये आपला सब ब्रँड आईक्यू सादर केला आहे. आता कंपनी हा भारतात पण आणण्याचा प्लान करत आहे. याबद्दल 91मोबाईल्सने आधीच माहिती दिली आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार एप्रिल मधेच या फोन भारतात येऊ शकतो. आईक्यू वीवोचा गेमिंग फोन आहे जो दमदार स्पेसिफिकेशन सह लॉन्च करण्यात आला आहे. या फोन मध्ये 6.41-इंचाचा फुल-एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. कंपनी ने हा 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वाटर ड्रॉप नॉच सह सादर केला आहे. हा फोन क्वालकॉमच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो. कंपनी ने हा 6जीबी, 10जीबी आणि 12जीबी रॅम सह सादर केला आहे. या फोन मध्ये 13-मेगापिक्सल + 12-मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी साठी फोन मध्ये 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
फेब्रवारी मध्ये रियलमी 3 मॉडेल भारतात सादर केला गेला होता. तेव्हाच कंपनी ने याचा अपग्रेड वर्जन सादर करणार असल्याचे सांगितले होते. तसेच काही दिवसांपूर्वी हा फोन भारतात बीएसआई च्या साइट वर लिस्ट झाला आहे. जरी फोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल माहिती नसली तरी काही लीक मध्ये असा दावा करण्यात आला आहे कि यात 48-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. तसेच कंपनी हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर सादर करू शकते. सोबत ट्रिपल कॅमेरा आणि 6जीबी रॅम असू शकतो.
गेल्या वर्षी शाओमी ने रेडमी 6 भारतात सादर केला होता. तसेच आता रेडमी 7 येणार आहे. अलीकडेच कंपनी ने हा चीन मध्ये लॉन्च केला आहे. फोनचे स्पेसिफिकेशन पाहता यात 19:9 आस्पेक्ट रेशियो वाली 6.26-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो आणि यात 1.8गीगाहट्र्ज चा क्वाडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. चीन मध्ये कंपनी ने हा तीन वेरियंट मध्ये सादर केला आहे आणि आशा आहे कि भारतात पण तिन्ही वेरियंट लॉन्च होतील. हा फोन 2जीबी, 3जीबी आणि 4जीबी रॅम मध्ये उपलब्ध आहे. त्याबरोबर 16जीबी, 32जीबी आणि 64जीबी की स्टोरेज आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
हा फोन कंपनी ने अलीकडेच फ्रांसची राजधानी पॅरिस मध्ये लॉन्च केला आहे. आता लवकरच भारतात पण येणार आहे. हुआवई पी30 मध्ये 6.1-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनी ने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. फोन मध्ये हुआवईची किरीन 980 एसओसी आहे जी 7एनएम चिपसेट वर चालते. फोटोग्राफी साठी फोन मध्ये फोन मध्ये 40 मेगापिक्सल + 16-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल ट्रिपल रियर सेंसर आहे. तसेच फ्रंट मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
या महिन्यात वीवो मिड रेंज मध्ये दोन फोन लॉन्च करणार आहे. कंपनी वाय5 आणि वाय3 सादर करू शकते. 91मोबाईल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार वाय3 कंपनी 10,000 ते 15,000 रुपयांच्या आत लॉन्च करणार आहे तर वाय5 थोडा महाग असेल. वीवो वाय5 ची किंमत 15,000 ते 20,000 रुपयांच्या आत असेल. स्पेसिफिकेशन पाहता याबाबत अजूनतरी जास्त माहिती मिळाली नाही पण आम्हाला मिळालेल्या बातमी नुसार वाय3 मीडियाटेक चिपसेट वर उपलब्ध होऊ शकतो तर वाय5 कंपनी स्नॅपड्रॅगॉन चिपसेट वर सादर करणार आहे.
पी30 प्रो बद्दल बोलायचे तर यात 6.47-इंचाचा ओएलईडी फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन (1080 x 2340 पिक्सल) आहे. स्मार्टफोन मध्ये लेटेस्ट किरिन 980 एसओसी आहे जो 7एनएम चिपसेट असून ड्यूल-एनयूपी ला सपोर्ट करतो. फोन 6जीबी रॅम+128जीबी इंटरनल स्टोरेज वेरियंट, 8जीबी रॅम+256जीबी इंटरनल स्टोरेज वेरियंट आणि 8जीबी रॅम+512जीबी स्टोरेज वेरियेंट सह सादर करण्यात आला आहे पण भारतात यातील कोणता येईल हे बघावे लागेल. फोटोग्राफी साठी फोन मध्ये चार कॅमेरा देण्यात आले आहेत. यात 40-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल + टीओएफ कॅमेरा सेंसर आहे.
या महिन्यात 10 एप्रिलला सॅमसंग एक इवेंट करत आहे आणि आशा आहे कि त्यादिवशी कंपनी गॅलेक्सी ए90 लॉन्च करेल. बातम्या पाहता हा कंपनीचा पहिला फोन असू शकतो जो पॉपअप कॅमेरा सह सादर केला जाऊ शकतो. आतापर्यंत मिळालेल्या माहिती नुसार हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 प्रोसेसर वर चालेल आणि यात 6.41-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो.
फेब्रवारी मध्ये सॅमसंग आपल्या बहुप्रतिक्षित फोल्डेबल फोनची माहिती दिली होती आणि तेव्हाच सांगितले ओटे कि 26 एप्रिल पासून हा फोन अनेक देशांत उपलब्ध होईल ज्यात भारत पण आहे. सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड नावाने सादर करण्यात आलेल्या या फोन मध्ये 7.3-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच फोल्ड केल्यावर बाहेरच्या बाजूला फक्त 4.6-इंचाची स्क्रीन मिळेल. कॅमेरा पाहता याचा मेन सेंसर 16-एमपी चा आहे. दूसरा सेंसर 12एमपी चा आहे. फोल्डच्या आत 10-एमपी चा एक कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये 12जीबी रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेज आहे.























