नोकिया ने यावर्षी फेब्रुवारीत आयोजित मोबाईल वर्ल्ड काग्रेंसच्या मंचावरून एक साथ 5 नवीन मोबाईल फोन लॉन्च केले होते. कंपनीने Nokia 4.2, Nokia 3.2, Nokia 9 PureView आणि Nokia 1 Plus सारख्या एंडरॉयड स्मार्टफोन्स सह Nokia 210 फीचर टेक मंचावर सादर केला होता. हे स्मार्टफोन अजून भारतीय बाजारात आले नाहीत आणि भारतात नोकिया फॅन्स नोकियाच्या नवीन स्मार्टफोन्सची वाट बघत आहेत. पण आता वाटते कि कंपनी लवकरच हि प्रतीक्षा संपवणार आहे. नोकियाचे नवीन स्मार्टफोन कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट झाले आहेत आणि आता लवकरच मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध होतील.
Nokia च्या इंडियन वेबसाइट वर नोकियाचे नवीन स्मार्टफोन्स लिस्ट करण्यात आले आहेत. पण इथे नोकियाच्या या पाच फोन पॅकी फक्त दोनच स्मार्टफोन आहेत. नोकिया इंडियाच्या ऑफिशियल साइट वर Nokia 4.2 आणि Nokia 3.2 चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहेत. या पेज वर स्मार्टफोन्सच्या किंमतीचा खुलासा नाही पण हे दोन्ही फोन आपल्या स्पेसिफिकेशन्स सह इथे आहेत. या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे कि नोकिया ब्रँडचे फोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबल आता लवकरच Nokia 4.2 आणि Nokia 3.2 भारतात लॉन्च करेल.
हे देखील वाचा: Nokia 4.2 आणि Nokia 3.2 इंडियन वेबसाइट वर झाले लिस्ट, लवकरच होतील भारतात लॉन्च
नोकिया 4.2
Nokia 4.2 पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2.5डी ग्लास ने प्रोटेक्टेड 5.71-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई च्या एंडरॉयड वन वर्जन वर सादर केला गेला आहे. इंडियन वेबसाइट वर हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट ने सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. Nokia 4.2 दोन वेरिएंट्स मध्ये कंपनीच्या वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे ज्यात 2जीबी रॅम सह 16जीबी स्टोरेज तसेच 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 400जीबी पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 4.2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 4.2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत Nokia 4.2 मध्ये पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: शाओमीची तयारी! 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च होईल हा दमदार फोन
नोकिया 3.2
Nokia 3.2 पण Nokia 4.2 प्रमाणे 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.26-इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. हा फोन पण एंडरॉयड 9 पाई आधारित एंडरॉयड वन वर्जन वर सादर केला गेला आहे. जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 429 चिपसेट वर चालेल. भारतीय बाजारात हा फोन 2जीबी रॅम सह 16जीबी स्टोरेज तसेच 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी वर लॉन्च होईल त्याचप्रमाणे या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 400जीबी पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफी साठी नोकिया 3.2 एफ/2.2 अपर्चर वाल्या 13-मेगापिक्सल रियर कॅमेरा तसेच सेल्फी साठी एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 3.2 के बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तथा साथ ही यह फोन फेस अनलॉक फीचर सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबत या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

















