बीएसएनएल 3जी सिम ला करत आहे 4जी सिम मध्ये अपग्रेड, लवकरच संपूर्ण देशात लागू होईल 4जी सर्विस, जियो-एयरटेल ला मिळेल टक्कर

देशाचा टेलीकॉम बाजार वेगाने प्रगती करत आहे. रिलायंस जियो सह एयरटेल, वोडाफोन आणि आइडिया सारख्या टेलीकॉम कंपन्या पण जास्तीत जास्त कस्टमर्स आकर्षित करण्यासाठी खुप स्वस्ता प्लान्स सादर करत आहेत आणि चांगली 4जी सर्विस देत आहेत. या रेस मध्ये देशातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल पण मागे राहू इच्छित नाही आणि त्यामुळे कंपनी ने पण देशभरात आपली 4जी सर्विस आणण्याची तयारी केली आहे. या सर्विस ची सुरवात बीएसएनएल ने देशात आपल्या 4जी सिम च्या विक्रीने केली आहे.

भारतीय संचार निगम लिमिटेड ने 4जी सिम ची विक्री सुरू केली आहे. कंपनी ने बीएसएनएल चा 4जी सिम फक्त 20 रुपयांमध्ये देत आहे. हे सिम प्रीपेड तसेच पोस्ट पेड दोन्ही ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आले आहे. लक्षात असू दे हे सिम आता फक्त सिम अपग्रेडेशन साठी लॉन्च करण्यात आला आहे, म्हणजे फक्त बीएसएनएल ग्राहक आपल्या जुन्या 3जी सिम ला 20 रुपये देऊन 4जी सिम मध्ये अपग्रेड करू शकतात.

बीएसएनएल च्या 4जी सिम विक्री वरून हे स्पष्ट झाले आहे की कंपनी देशात आपली 4जी सर्विस आणण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि येणार्‍या दिवसांमध्ये बीएसएनएल पण 4जी नेटवर्क असलेली कंपनी बनेल. पण बीएसएनएल सध्यातरी केरळ मध्येच 4जी सर्विस देत होती तसेच इतर राज्यांमध्ये सध्या फक्त 3जी नेटवर्क उपलब्ध होते.

बीएसएनएल ग्राहक जवळच्या कोणत्याही मोबाइल स्टोर वर जाऊन आपल्या बीएसएनएल सिम ला 4जी सिम मध्ये अपग्रेड करू शकतात. विशेष म्हणजे जेव्हा बीएसएनएल ने 2जी सिम 3जी मध्ये अपग्रेड केले होते तेव्हा कंपनी 200 रुपये घेतले होते. पण आता 3जी वरून 4जी सिम घेण्यासाठी बीएसएनएल ने फक्त 20 रुपये शुल्क ठेवले आहे. यावरुन हे स्पष्ट होत आहे की जियो व अन्य खाजगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएल पण देशात आपल्या 4जी कस्टमर्स ची संख्या वाढवू इच्छित आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here