Nothing Phone (2) लवकरच येऊ शकतो भारतात; BIS वेबसाइटवर लिस्ट झाला फोन

Highlights

  • Nothing Phone (2) भारतीय BIS सर्टफिकेशन वेबसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे.
  • BIS च्या लिस्टिंगमुळे फोनच्या भारतीय लाँचची शक्यता वाढली.
  • हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो.

नथिंगनं अलीकडेच आपला नथिंग फोन (2) स्मार्टफोन येणार असल्याची माहिती दिली होती. असं बोललं जात आहे की हा एक अपर मिड-रेंज स्मार्टफोन असेल आणि स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसरसह येऊ शकतो. तसेच डिवाइस Q2/Q3 2023 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. आता ऑफिशियल रिलीजपूर्वी हा मोबाइल फोन भारतीय BIS सर्टिफिकेशन ऑथोरिटी वेबसाइटवर दिसला आहे, ज्यामुळे हा भारतात लाँच होणार असल्याचा इशारा मिळाला आहे.

BIS वर लिस्ट झाला नथिंग फोन (2)

नथिंग फोन (2) (नथिंग AIN065 मॉडेल नंबरसह अलीकडेच इंडियन BIS सर्टिफिकेशनवरून सर्टिफाइड करण्यात आला आहे. बीआयएस सर्टिफिकेशन लिस्टिंगमधून आम्हाला डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्सची कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित झाली आहे की डिवाइस लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: अ‍ॅमेझॉनवर हे आहेत बेस्ट सेलिंग अफोर्डेबल आणि मिड रेंज स्मार्टफोन, पाहा लिस्ट

एखाद्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर मॉडेल नंबरसह हा फोन समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच लिस्टिंगमधील ब्रँडचा कल पाहता मॉडेल नंबरवरून नथिंग फोन (2) हे नाव स्पष्ट होत नाही. त्यामुळे ठामपणे सांगता येणार नाही. परंतु कंपनीचा जुना ट्रेंड पाहता असं वाटत आहे की ही लिस्टिंग नथिंग फोन (2) ची आहे.

कंपनीनं कन्फर्म केला Nothing Phone (2) चा लाँच

काही दिवसांपूर्वी बार्सिलोनामध्ये आयोजित मोबाइल वर्ल्ड कॉन्ग्रेस दरम्यान कंपनीचे को-फाउंडर कार्ल पेई यांनी Nothing Phone (2) बद्दल मोठी घोषणा केली होती. त्यांनी सांगितलं आहे की ”नथिंग फोन 2 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन सीरीजसह लाँच केला जाईल आणि हा जुन्या मॉडेलच्या तुलनेत प्रीमियम असेल.” परंतु त्यांनी लाँच डेट बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. हे देखील वाचा: फक्त 8999 रुपयांमध्ये 50MP कॅमेरा आणि 16GB RAM पावर; Infinix Hot 30i भारतात लाँच

Nothing Phone 2 चे स्पेसिफिकेशन (लीक)

Nothing Phone 2 चे स्पेसिफिकेशन्सबद्दल आतापर्यंत कोणतीही मोठी माहिती समोर आली नाही. परंतु इंटरनेटवर जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार पाहता, या फोनमध्ये तुम्हाला 12जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी मिळू शकते. राहिला प्रश्न डिस्प्लेचा तर फोनमध्ये तुम्हाला अ‍ॅमोलेड पॅनल मिळू शकतो. स्क्रीन साइजची माहिती अद्याप समोर आली नाही परंतु लीक रिपोर्टनुसार हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here