48MP कॅमेऱ्यासह 28 मे ला समोर येईल Redmi K20 स्मार्टफोन, करेल सर्वांची सुट्टी

शाओमी भारतात लवकरच आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. याबद्दल कंपनीने स्वतः टीज केले आहे. शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनु कुमार जैन यांनी ट्वीट करून अशी हिंट दिली आहे कि अपकमिंग फोन Redmi K20 असेल जो फ्लॅगशिप कॅटगरी मध्ये सादर केला जाईल. पण भारताआधी डिवाइसच्या चीन मधील लॉन्चची डेट समोर आली आहे.

चीनी सोशल मीडिया साइट वीबो वर समोर आलेल्या एका ऑफिशियल टीजर नुसार हा स्मार्टफोन 28 मे ला लॉन्च होईल. टीजर नुसार Redmi K20 स्मार्टफोन बीजिंग मध्ये एका इवेंट मध्ये लॉन्च होईल. टीजर मध्ये सांगण्यात आले आहे कि या स्मार्टफोन मध्ये Sony IMX586 सेंसर सह 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. तसेच फोन मध्ये 960fps वर इन्स्टंट स्लो-मोशन विडियो रेकॉर्डिंगचा सपोर्ट पण असेल.

आता पर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार फोन मध्ये 4,000 एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच स्क्रीनशॉटच्या आकारावरून स्पष्ट झाले आहे कि रेडमीच्या या डिवाइस मध्ये फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) रिजोल्यूशन असलेली स्क्रीन असेल.

काही लीक नुसार रेडमी फ्लॅगशिप फोन मध्ये 6.39-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले असेल. सोबतच हँडसेट ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येईल. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि 13 मेगापिक्सलचा सेंसर असेल. या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. रेडमी फ्लॅगशिप फोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असू शकते. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्ट मधून या फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई वर आधारित मीयूआई 10 असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here