OPPO ने या महिन्याच्या सुरवातीलाच टेक मंचावर हडबडी निर्माण करत आपली नवी आणि अनोख्या अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा टेक्नॉलॉजी सादर केली होती. आतापर्यंत वॉटरड्रॉप नॉच, पॉप-अप आणि पंच-होल डिस्प्ले मध्ये सेल्फी कॅमेरा दिले जात होते पण ओपोच्या या फोन मध्ये स्क्रीनच्या खाली कॅमेरा असेल जो बाहेरून दिसणार नाही. Oppo द्वारा आतापर्यंत फक्त या टेक्नॉलॉजीची माहिती देण्यात आली होती आणि एक शार्ट क्लिप सोशल प्लॅटफॉर्म वर शेयर करण्यात आली होती. पण आता लवकरच हि टेक्नॉलॉजी सर्वांसमोर येणार आहे. 26 जूनला Oppo हि अनोखी टेक्नॉलॉजी जगासमोर सादर करेल.
Oppo ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक टीजर ईमेज शेयर करत सांगितले आहे कि कंपनी आपली under-display camera टेक्नॉलॉजी जगासमोर आणणार आहे. ओपो नुसार 26 जूनला शांघाई मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस 2019 शांघाई एग्जीबिशनच्या मंचावरून कंपनी अंडर-डिस्प्ले कॅमेरा टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन सादर करेल. Oppo ने under-display cameraunder-display camera असलेल्या या फोनचे नाव काय असले आणि हा एक प्रोटोटाईप डिवाईस असेल कि रेडी टू सेल असेल हे सांगितले नाही.
अशी असेल टेक्नॉलॉजी
पंच-होल डिस्प्ले कॅमेरा टेक्नॉलॉजी डिस्प्ले वर कॅमेरा प्लेटमेंटची सर्वात लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. यात फोन डिस्प्ले वर छोटासा छिद्र दिला जातो आणि या छिद्रात सेल्फी कॅमेरा असतो. पण इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजीचे एडवांस वर्जन असेल. ज्याप्रकारे स्मार्टफोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर काम करतो त्याचप्रमाणे इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा टेक्नॉलॉजी पण काम करेल. म्हणजे फिंगरप्रिंट सेंसर प्रमाणे हा सेल्फी कॅमेरा पण इनविजिबल अर्थात् अदृश्य असेल आणि बाहेरून दिसणार नाही.
For those seeking the perfect, notchless smartphone screen experience – prepare to be amazed. ?
You are taking a very first look at our under-display selfie camera technology. RT! ? pic.twitter.com/FrqB6RiJaY
— OPPO (@oppo) June 3, 2019
अशी करेल काम
हि टेक्नॉलॉजी असलेल्या आगामी स्मार्टफोन्स मध्ये सेल्फी कॅमेरा इनविजिबल असेल. अंदाज लावला जात कि हा फोन एक नव्हे तर दोन डिस्प्ले सह येईल. फोन डिस्प्ले खाली अजून एक डिस्प्ले असेल. खालच्या डिस्प्ले वरच सेल्फी कॅमेरा सेंसर असेल. कॅमेरा सोबतच या डिस्प्ले वर लाईट सेंसर पण दिला जाईल. हा लाईट सेंसर दोन्ही डिस्प्ले सह येईल. टेक्नॉलॉजी अशी असेल कि सेल्फीची कमांड देताच खालच्या डिस्प्ले वरील कॅमेरा सेसर चालू होईल आणि फोटो कॅप्चर करेल.
हा सेल्फी कॅमेरा डिस्प्ले खालूनच काम करेल आणि डिस्प्लेच्या बाहेरून यूजर हा बघू शकणार नाहीत. हि टेक्नॉलॉजी बऱ्याच अंशी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सारखी असेल. हा फिंगरप्रिंट सेंसर पण डिस्प्ले खाली असतो जो बाहेरून दिसत नाही. जेव्हा बोट डिस्प्लेला स्पर्श करतो तेव्हा खालील फिंगरप्रिंट सेंसर तो स्पर्श रीड करतो तसेच फोन अनलॉक करतो.















