लहान मुलगी वापरत होती iPhone 6, अचानक लागली आग

स्मार्टफोन्स मध्ये आग लागण्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. पुन्हा एकदा एका फोन मध्ये आग लागल्याची बातमी समोर आली आहे. कॅलिफोर्निया मधील एका 11 वर्षीय मुलीच्या ऍप्पल आईफोन 6 मध्ये अचानक आग लागली, त्यामुळे ती खूप घाबरली होती.

9 टू 5 मॅक च्या रिपोर्टनुसार, जेव्हा फोन मध्ये आग लागली तेव्हा ती बेड वर बसली होती. या घटनेमुळे चादरीमध्ये होल झाला आणि त्या मुलीने फोनला आग लागतच तो फेजूं दिला. मुलगी म्हणते कि जेव्हा ती आपला फोन घेऊन बसली होती, तेव्हा आईफोन मधून ठिणग्या बाहेर पडू लागल्या. तिची आई मारिया अडाटा यांनी ऍप्पल सपोर्टला फोन केला, त्या नंतर त्यांना आईफोनचे फोटो पाठवण्यास आणि रिटेल विक्रेत्यास फोन करण्यास सांगण्यात आले. मुलीचे आई म्हणते कि माझी मुलगी सुखरूप आहे यातच मी खुश आहे.

कंपनीनुसार अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांच्यामुळे एका आईफोन मध्ये आग लागू शकते, जसे अनधिकृत चार्जिग केबल आणि चार्जरचा वापर. कंपनी याप्रकारची चौकशी करत आहे. काही दिवसांपूर्वी गूगल पिक्सल 3 एक्सएल मध्ये आग लागल्याची बातमी यूएस मधील टोरंटो मधून समोर आली होती. स्मार्टफोन यूजरने सोशल मीडिया वर पोस्ट करत या दुर्घटनेची माहिती दिली होती. यूजरने जळालेल्या फोनचे फोटो पण शेयर केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार टोरंटो मध्ये राहणाऱ्या यूजरने सांगितले आहे कि चार्जिंग करताना त्याचा पिक्सल 3 एक्सएल स्मार्टफोन खुप जास्त गरम झाला आणि काही वेळाने फोन मधून धूर येऊ लागला व आग लागली.

यूजरने सांगितले होते त्यांनी पिक्सल 3 एक्सएल खोलीत चार्जिंगसाठी लावला होता. चार्जिंग चालू असताना फोन गरम होत असल्याचे त्यांना जाणवले. फोन थंड करण्यासाठी त्यांनी चार्जिंग बंद केली होती तसेच फोन मधून चार्जर काढून टाकला. पण चार्जिंग बंद केल्यानंतर काही क्षणातच फोन मधून धूर येऊ लागला. यूजरने धूर पाहून फोन बाल्कनीत फेकला. बाहेर फेकल्यानंतर यूजरने बघितले कि फोन मधून येणार धूर वाढला आहे आणि मग अचानकपणे फोनला आग लागली.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here