फ्लॅगशिप कीलर वनप्लस 6 लॉन्च! 8जीबी रॅम, 6.28-इंचाच्या नॉच डिस्प्ले सह हा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो

फ्लॅगशिप कीलर म्हणून ओळखली जाणारी टेक कंपनी वनप्लस चे नेमकेच स्मार्टफोन्स असूनही भारता सह जगभरात नाव कमावले आहे. वनप्लस ची फॅन फॉलोइंग भारतात पण खुप जास्त आहे. जेव्हा पासून कंपनी ने घोषणा केली होती की वनप्लस 6 येणार आहे तेव्हा पासून देशात या फोनची वाट बघितली जात आहे. आज वनप्लस ने आपला हा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 6 ग्लोबली लॉन्च केला आहे.

वनप्लस 6 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या नॉच डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 2280 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.28-इंचाची एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आॅक्सीजन ओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे जो लवकरच एंडरॉयड पी वर अपडेट होईल. वनप्लस 6 मध्ये 2.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आॅक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे त्याचबरोबर हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो.

वनप्लस 6 तीन वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. एक वेरिएंट 6जीबी रॅम सह 64जीबी मेमरी ला सपोर्ट करतो तर दुसरा वेरिएंट 8जीबी रॅम सह 128जीबी मेमरी सह सादर करण्यात आला आहे. सोबतच कंपनी ने वनप्लस 6 चा स्पेशल एडिशन पण लॉन्च केला आहे जो 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरी ला सपोर्ट करतो. चांगल्या ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू आहे.

वनप्लस 6 च्या फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये डुअल एलईडी फ्लॅश सह 20-मेगापिक्सल चा सोनी आईएमएक्स 376के सेंसर आणि 16-मेगापिक्सल चा सोनी आईएमएक्स 519 कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सल चा सोनी आईएमएक्स 371 सेल्फी कॅमेरा सेंसर आहे.

वनप्लस 6 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो तसेच फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. या फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. फोन च्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. या फोन मध्ये टाईप-सी सपोर्ट सह डॅश चार्जिंग सपोर्ट वाली 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता फोन च्या 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 529 यूएस डॉलर (जवळपास 35,800 रुपये), 8जीबी रॅम/128जीबी मेमरी वेरिएंट 579 यूएस डॉलर (जवळपास 39,200 रुपये) तर 8जीबी रॅम/256जीबी वेरिएंट 629 यूएस डॉलर (जवळपास 42,500 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. वनप्लस 6 चा मिरर ब्लॅक आणि मीडनाईट ब्लॅक वेरिएंट 22 मे पासून अंर्तराष्ट्रीय मंचावर सेल साठी उपलब्ध होईल तर या फोन च्या सिल्क व्हाईट एडिशन साठी 5 जून ची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here