नॉच विना आणि पंच होल सह येईल मोटोरोलाचा नवीन फोन, समोर आले फोटो

लेनोवो अधिकृत कंपनी मोटोरोला पण दुसऱ्या कंपन्यांप्रमाणे आपले फोन्स नवीन डिजाइनसह सादर करत आहे. कंपनीने अलीकडेच आपले फोन्स पंच होल आणि नॉच डिस्प्ले सह सादर केले होते. आता समोर येत असलेल्या नव्या माहितीनुसार कंपनी असा फोन घेऊन येणार आहे, ज्यात नॉच किंवा पंच होल नसेल.

मोटोरोलच्या नवीन फोनचे फोटो पॉप्यूलर टिपस्टर Evan Blass यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर शेयर केले आहेत. फोटोज व्यतिरिक्त फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि नावाव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. फोटोज नुसार फोनच्या वर वरच्या बाजूला बेजल दिसत नाही. तसेच खालच्या बाजूला बेजल्स आहेत ज्या वर कंपनीचे नाव आहे.

त्याचप्रमाणे फोनच्या राइट साइडला वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे. फोनची डिजाइन पाहता असे वाटत आहे कि कंपनीचा अपकमिंग डिवाइस पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह येईल. तसेच टिप्सटर Evan ने अजून काही माहिती दिली नाही. इमेज सोबत कॅप्शन मध्ये लिहिले “Which Moto is this?”. अशा आहे कि येत्या काळात फोन संबंधित अजून नवीन माहिती समोर येईल.

अलीकडेच Motorola ने भारतीय मीडियाला लॉन्च डेटचे इन्वाईट पाठवले आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि कंपनी 23 ऑगस्टला देशात लॉन्च ईवेंटचे आयोजन करेल. पण मोटोरोला ने 23 ऑगस्टला कोणता स्मार्टफोन लॉन्च केला जाईल याचा खुलासा केला नाही. पण आपल्या इन्वाईट मध्ये Motorola ने Capture the Action हॅशटॅग वापरला आहे. टॅग वरून समजले आहे कि 23 ऑगस्टला भारतात लॉन्च होणार स्मार्टफोन Motorola One Action असेल.

Motorola One Action

आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार Motorola One Action 21:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 1,080 x 2,520 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करेल. एंडरॉयड वन ओएस सोबत प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9609 चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. त्याचबरोबर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली जी72 जीपीयू मिळू शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here