Samsung बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या समोर येत होत्या कि कंपनी ‘Galaxy A’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोन्स वर काम करत आहे आणि सीरीज मधील आधीच्या स्मार्टफोन्सचे नवीन वर्जन येतील. या यादीत Galaxy A30 आणि Galaxy A50 च्या नवीन मॉडेल्सच्या नावाचा समावेश होता. आज Samsung ने आपले नवीन मॉडेल्स समोर आणत टेक बाजारात दोन नवीन स्मार्टफोन Galaxy A50s आणि Galaxy A30s सादर केले आहेत. शानदार लुक व दमदार स्पेसिफिकेशन्स सह येणारे हे दोन्ही स्मार्टफोन आपल्या आधीच्या वर्जन पेक्षा पण जास्त पावरफुल आहेत. चला तर जाणून घेऊया या दोन्ही नवीन स्मार्टफोन्सची माहिती.
Galaxy A50s
Samsung ने Galaxy A50s स्मार्टफोन 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले वर सादर केला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई वर सादर झाला आहे जो क्वॉड 2.3गीगाहर्ट्ज + क्वॉड 1.7गीगाहर्ट्ज प्रोसेसर वर चालतो. सॅमसंग ने Galaxy A50s मधील चिपसेटची माहिती दिली नाही पण वेगवेगळ्या बाजारांत हा फोन वेगवेगळ्या चिपसेट वर लॉन्च होईल.
Galaxy A50s कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. यात 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम वेरिएंटचा समावेश आहे जे 64जीबी इंटरनल मेमरी तसेच 128जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतील. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Galaxy A50s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.
त्याचबरोबर Galaxy A50s 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसर आणि 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी गॅलेक्सी ए50एस मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A50s मध्ये सिक्योरिटी साठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाल्या 4,000एमएएच बॅटरी सह येतो.
Samsung Galaxy A30s
Samsung Galaxy A30s कंपनीने 720 × 1560 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन पण एंडरॉयड 9.0 पाई वर सादर झाला आहे जो डुअल 1.8गीगाहर्ट्ज + हेक्सा 1.6गीगाहर्ट्ज प्रोसेसर सह चालतो. Galaxy A30s वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळ्या चिपसेट वर लॉन्च होईल.
Galaxy A30s पण दोन रॅम वेरिएंट्स मध्ये आला आहे ज्यात 3जीबी रॅम आणि 4जीबी रॅम चा समावेश आहे. हा फोन 32जीबी मेमरी, 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरीच्या तीन स्टोरेज आप्शन्स मध्ये विकत घेता येईल जे 512जीबी कार्ड सपोर्ट सह येतील. फोटोग्राफी साठी Galaxy A30s पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Samsung Galaxy A30s एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Samsung Galaxy A30s मध्ये पण सिक्योरिटी साठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी हा फोन पण 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
Samsung ने Galaxy A50s आणि Galaxy A30s दोन्ही स्मार्टफोन्स प्रिजम क्रश ब्लॅक, प्रिजम क्रश व्हाईट, प्रिजम क्रश ग्रीन आणि प्रिजम क्रश वॉयलेट कलर वेरिएंट मध्ये सादर केले गेले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये कधी लॉन्च केले जातील हे सांगता येणार नाही.
















