Vivo भारतात आपली नवीन सीरीज वीवो यू सीरीज सादर करणार आहे. या सीरीजचा पहिला फोन Vivo U10 असेल जो 24 सप्टेंबरला भारतात लॉन्च केला जाईल. फोन एक्सक्लूसिवली अमेझॉन इंडिया वर विकला जाईल. तसेच आता 91मोबाईल्सला U10 ची लाइव इमेज मिळाली आहे.
हि लाइव इमेज आम्हाला आमच्या सूत्रांकडून मिळाली आहे, ज्यावरून फोनच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. फोटो नुसार फोन मध्ये यू नॉच डिस्प्ले असेल. खालच्या बाजूला थोडे बेजल्स दिसत आहेत. तसेच फोनच्या उजव्या बाजूला वॉल्यूम रॉकर बटण आणि पावर बटण असेल. फोनच्या मागील भागाचा फोटो मिळाला नाही.
91मोबाईल्सशी बोलताना Vivo India वीवो इंडियाचे निर्देशक (ब्रँड स्ट्रॅटेजी) निपुण मार्या यांनी सांगितले होते कि Vivo U10 स्मार्टफोन याच महिन्यात भारतीय बाजारात येईल जो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सेल साठी पण उपलब्ध होईल.
निपुण मार्या यांनी सांगितले कि Vivo U सीरीज सह कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. त्यांनी सांगितले कि Vivo U10 कंपनी एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. त्यामुळे Vivo U10 चा सर्वात मोठ्या वेरिएंटची किंमत जास्तीत जास्त 12,000 रुपयांच्या आसपास असेल.
विशेष म्हणजे Vivo U10 ची मुख्य यूएसपी फोनची मोठी व दमदार बॅटरी असेल. निपुण मार्या यांनी Vivo U10 ला Unstoppable चा टॅग दिला आहे. निपुण यांच्या मते Vivo U10 ची सर्वात मोठी पावर फोनचा बॅटरी सेग्मेंट असेल. कपंनीच्या अधिकाऱ्यांनी Vivo U10 च्या बॅटरी एमएएच ची माहिती दिली नाही. तसेच फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल जास्त माहिती मिळाली नाही.
वीवो ने अलीकडेच कन्फर्म केले होते कि कंपनी 20 सप्टेंबरला भारतात Vivo V17 Pro स्मार्टफोन लॉन्च करेल. Vivo V17 Pro 32-मेगापिक्सल ड्यूल पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन असेल.

















