चिनी कंपनी Xiaomi ने आपल्या Diwali with Mi sale सेलची घोषणा केली आहे. शाओमीचा हा सेल 28 सप्टेंबर पासून 4 ऑक्टोबर पर्यंत चालेल. या सेल मध्ये शानदार डिस्काउंट सोबत दमदार डील्स मिळतील. या सेल मध्ये Mi Pocket स्पीकर, Mi Travel बॅकपॅक समवेत अनेक प्रॉडक्ट्स वर 80 टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल.
पेमेंट ऑफर्स
शाओमीच्या या सेल मध्ये HDFC बॅंक कार्ड्स आणि EMI ट्रँजॅक्शन वर 10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. हा सेल Mi.com वर होईल. चला जाणून घेऊया कि या सेल मध्ये शाओमीच्या कोणत्या प्रॉडक्ट वर किती डिस्काउंट मिळेल.
1 रुपयांमध्ये मिळेल स्मार्टफोन
या सेल मध्ये फक्त 1 रुपयांमध्ये तुम्ही स्मार्टफोन विकत घेऊ शकाल. रोज 1 रुपयांचा फ्लॅश सेल होईल, ज्यात तुम्ही Redmi K20, Mi Smart Band 4 समवेत शाओमीचे अनेक प्रॉडक्ट्स फक्त 1 रुपयात विकत घेऊ शकाल. 1 रुपयांचा फ्लॅश सेल 28 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत रोज संध्यकाळी 4 वाजता सुरु होईल.
क्रेजी डील्स
सेल मध्ये रोज सकाळी 10 वाजता आणि संध्यकाळी 6 वाजेपर्यंत क्रेजी डील्सचे आयोजन केले जाईल. तसेच Mi ईयरफोन्स वर 50 टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल. मोबाईल ऍक्सेसरीज 49 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येतील.
POCO F1 वर कंपनी कडून 12000 रुपये आणि Redmi K20Pro वर 4000 रुपये, Redmi K20 वर 3000 रुपये, RedmiNote7Pro वर 4000 रुपये, Redmi Note 7S वर 4000 रुपये, Redmi Y3 वर 4000 रुपये, Redmi 7 वर 3000 रुपये आणि Redmi 7A वर 4999 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. सेल मध्ये Redmi K20 Pro स्मार्टफोन 24,999 रुपये आणि Redmi Note 7S स्मार्टफोन 8,999 रुपयांमध्ये लिस्ट होईल.















