इंटरनेट स्पीडच्या बाबतीती पुन्हा एकदा पाकिस्तनाच्या मागे आहे भारत, समोर आले आकडे

आज भारतात ज्या वेगाने इंटरनेट यूजर्सची संख्या वाढत आहे, त्यापेक्षा अनेकपटीने डेटाचा वापर पण वाढला आहे. पण इंटरनेट स्पीडच्या बाबतीती आपण सर्वात मागे आहोत. मोबाईल ब्रॉडबॅंड स्पीडच्या बाबतीती सप्टेंबर , 2019 मध्ये भारताने 128वे स्थान मिळवले आहे. या पोजिशन वर भारत आपल्या शेजारी देशांच्या मागे आहे. या लिस्ट मध्ये भारत इतर देश जसे कि श्रीलंका, पाकिस्तान आणि नेपाळच्या पण मागे राहिला आहे.

इंटरनेट स्पीड संबंधित हा डेटा Ookla च्या रिपोर्ट मध्ये समोर आला आहे. विशेष म्हणजे Ookla च्या स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स मध्ये समोर आले आहे कि ग्लोबल एवरेज डाउनलोड स्पीड 29.5Mbps आहे आणि एवरेज अपलोड स्पीड 11.34Mbps आहे. रिपोर्ट मध्ये साउथ कोरिया ग्लोबल चार्ट मध्ये टॉपला आहे.

साउथ कोरियाचा डाउनलोड स्पीड 95.11Mbps आणि अपलोड स्पीड 17.55Mbps रेकॉर्ड करण्यात आला आहे. भारताबद्दल बोलायचे तर इथे डाउनलोड स्पीड 11.18Mbps आणि अपलोड स्पीड 4.38Mbps सांगण्यात आला आहे.

Ookla नुसार भारतात साल 2019 च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत फिक्स्ड ब्रॉडबॅंड स्पीड मध्ये 16.5 टक्क्यांची वाढ झाली आणि सप्टेंबर मध्ये 34.07Mbps च्या पार पोचला. ब्रॉडबॅंड इंटरनेट स्पीडच्या बाबतीती Hathway दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्थानी Hathway अनेक दिवसांपासून कायम आहे. या रिपोर्ट नुसार दुसऱ्या क्रमांकावरील Hathway चा टॉप स्पीड 33.69Mbps होता. जियो बद्दल बोलायचे तर ऑगस्ट मध्ये जियोचा स्पीड कमी होऊन 17.52Mbps झाला होता जो सप्टेंबर मध्ये गीगाफाइबर सर्विसच्या लॉन्च नंतर 41.99Mbps झाला. आशा आहे कि येत्या काळात खूप मोठा बदल दिसेल.

देशातील 15 मोठ्या शहरांत फिक्स्ड आणि मोबाईल डाउनलोड स्पीडच्या तुलनेत जियोला साल 2019 च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत 5 मोठ्या शहरांत सर्वात वेगवान फिक्स्ड ब्रॉडबॅंड इंटरनेट स्पीड देण्याचा खिताब मिळाला. ACT 4 शहरांमध्ये फास्टेस्ट इंटरनेट प्रोवाइडर होती. हॅथवे चेन्नई मध्ये सर्वात जास्त स्पीड देणारी इंटरनेट सर्विस प्रोवाइडर बनली. तर लखनऊ आणि जयपुर मध्ये ACT फाइबरनेटला सर्वात जास्त स्पीड स्कोर मिळाला.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here