Samsung यावर्षीच्या शेवटी आपल्या ‘Galaxy A’ मध्ये विस्तार करत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A51 लॉन्च करू शकते. 91मोबाईल्सने आधीच सांगितले आहे कि सॅमसंगच्या नोएडा मधील फॅक्टरी मध्ये Galaxy A51 ची निर्मिती सुरु झाली आहे. आम्ही या बातमीसह गॅलेक्सी ए51 च्या मॅन्युफॅक्चरिंग स्टेजचे फोटोज पण दाखवले होते. काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy A51 चा सपोर्ट पेज पण समोर आला होता जो सॅमसंगच्या रशियन वेबसाइट वर लिस्ट होता. आता नवीन लीक मध्ये Samsung Galaxy A51 च्या कॅमेरा डिटेलचा खुलासा पण झाला आहे.
क्वॉड रियर कॅमेरा
Samsung Galaxy A51 बद्दल बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन सॅमसंगचा सर्वात स्वस्त क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन असू शकतो. सॅममोबाईलच्या रिपोर्ट नुसार Samsung Galaxy A51 च्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर दिले जातील जे L-शेप रियर कॅमेरा सेटअप मध्ये असतील. फ्लॅश लाईट पण या कॅमेरा सेटअप मध्ये असेल. रिपोर्ट नुसार Samsung Galaxy A51 मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल.
त्याचबरोबर Samsung Galaxy A51 च्या बॅक पॅनल वर 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसिंग सेंसर आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस दिली जाईल. तसेच रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल जो फोनच्या डिस्प्ले वरील पंच-होल मध्ये असेल. हा पंच-होल कॅमेरा सेंसर डिस्प्लेच्या मध्यस्थानी वरच्या बाजूला असेल.
असा असेल लुक
Samsung Galaxy A51 पंच-होल डिस्प्ले सह दिसत आहे. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे ज्यावर वरच्या बाजूला मधोमध छोटासा होल आहे. या होल मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. समोर आलेल्या फोटो मध्ये Galaxy A51 चा डिस्प्ले चारही बाजुंनी फुल बेजल लेस दिसत आहे. फोनचा बॅक पॅनल पाहता इथे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे.
Galaxy A51 चा रियर कॅमेरा सेटअप पॅनलच्या वरच्या बाजूला डावीकडे देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये चार लेंस आहेत ज्या L-शेप मध्ये आहेत. तीन सेंसर एकाच रेषेत आहेत तर चौथा सेंसर खाली उजवीकडे आहे. या चौथ्या सेंसरच्या वर फ्लॅश लाईट आहे. Samsung Galaxy A51 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही तसेच खालच्या बाजूला Samsung ची ब्रँडिंग आहे.
Samsung Galaxy A51 च्या लोवर पॅनल वर मधोमध यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. या पोर्टच्या उजवीकडे 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तर डावीकडे स्पीकर ग्रिल आहे. गॅलेक्सी ए51 च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहेत तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. Samsung Galaxy A51 फोटोज मध्ये खूप ग्लॉसी दिसत आहे ज्यावरून वाटते कि या फोनच्या बॅक पॅनल वर पण ग्लास लेयर असेल.
स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 6.5 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल जो वनयूआई 2.0 आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी Galaxy A51 मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट मिळेल.
Galaxy A51 च्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असू शकतो. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 12 मेगापिक्सलची वाईड एंगल लेंस, 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A51 4,000 एमएमएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो.
















