Xiaomi Mi 10 आणि Mi 10 Pro च्या वेरिएंट्स आणि किंमतींचा खुलासा, सर्वात पावरफुल असतील हे शाओमी फोन

Xiaomi आपल्या ‘मी सीरीज’ च्या आगामी स्मार्टफोन्स Mi 10 आणि Mi 10 Pro वर काम करत आहे. हे दोन्ही फोन कंपनीचे 5G स्मार्टफोन असतील, जे फेब्रुवारी मध्ये टेक मंचावर येतील. या दोन्ही डिवाईसेज बाबत आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत. आता चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेइबो वर एका टिपस्टरने शाओमी मी सीरीज संबंधित महत्वाचा खुलासा केला गेला आहे. नवीन लीक मध्ये फक्त Mi 10 आणि Mi 10 Pro च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे तसेच या दोन्ही स्मार्टफोनच्या वेरिएंट्स आणि किंमतींचा खुलासा पण झाला आहे. स्पेसिफिकेशन्स समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि Mi 10 आणि Mi 10 Pro Xiaomi चे सर्वात पावरफुल स्मार्टफोन असतील.

Xiaomi Mi 10

सर्वात आधी शाओमी मी 10 बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या ओएलईडी डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. बोलले जात आहे कि हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल. Xiaomi Mi 10 एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 10 आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये प्रोसेसिंग साठी क्वॉलकॉमच्या आगामी चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 दिला जाऊ शकतो.

फोटोग्राफी साठी Xiaomi Mi 10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीक नुसार फोन मध्ये Sony IMX686 प्राइमरी सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनल वर एक कॅमेरा सेंसर 20 मेगापिक्सलचा असेल. तसेच एक 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि एक 5 मेगापिक्सलचा सेंसर दिला जाईल जो डेफ्थ सेंसर किंवा मॅक्रो लेंस असू शकते. लीकनुसार Mi 10 मध्ये 30x digital zoom मिळेल.

लीक मध्ये Xiaomi Mi 10 तीन वेरिएंट्स मध्ये दाखवण्यात आला आहे ज्यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज दिली जाईल. तसेच पावर बॅकअप साठी शाओमी मी 10 मध्ये 40वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4500एमएएच ची बॅटरी मिळू शकते. हा फोन डुअल मोड 5जी आणि एनएफसी सारख्या फीचर्स सह येईल.

Xiaomi Mi 10 Pro

वेईबो पोस्ट वर सांगण्यात आले आहे कि शाओमी मी 10 प्रो पण क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल आणि फोनच्या बॅक पॅनल वर 108 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर Mi 10 Pro मध्ये 48 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर मिळेल. फोन मध्ये 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलचा चौथा सेंसर दिला जाईल. Mi 10 Pro च्या सेल्फी कॅमेऱ्या बाबतीत अजूनही कोणतीही माहिती समोर आली नाही. हा फोन पण एंडरॉयड 10 आधारित मीयूआई 11 वर लॉन्च होईल.

Mi 10 Pro बाबत बोलले जात आहे कि हा फोन शाओमीच्या 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह येईल आणि फोन मध्ये 4500एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल. फोनच्या वेरिएंट्स बद्दल बोलायचे तर Xiaomi Mi 10 Pro 12 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो तसेच यांची किंमत क्रमश: 3799 युआन (जवळपास 38,900 रुपये), 4099 युआन (जवळपास 41,900 रुपये) आणि 4499 युआन (जवळपास 46,000 रुपये) असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here