1 मार्च पासून टीव्ही बघणे होणार स्वस्त, सरकारने दिली नव्या वर्षाची भेट

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्राई देशातील टीव्ही ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. ट्राईच्या नवीन नियमांनुसार आता येत्या 1 मार्च 2020 पासून टीव्ही ग्राहकांना 130 रुपयांमध्ये (टॅक्स वगळता) कमीत कमी 200 फ्री टू एयर चॅनेल बघायला मिळतील. याआधी ग्राहकांना 130 रुपयांमध्ये फक्त 100 चॅनेल मिळत होते.

पुन्हा बदलेल चॅनेल्सची किंमत

ट्राईने स्पष्ट केले आहे कि कंपन्यांना नवीन टॅरिफची माहिती 15 जानेवारी पर्यंत आपल्या वेबसाइट वर अपडेट करावी लागेल. 30 जानेवारी पर्यंत पुन्हा सर्व चॅनेल्सची रेट लिस्ट अपडेट केली जाईल, ज्यानंतर ग्राहक चॅनेल नवीन किंमतींसह निवडू शकतील. ट्राईच्या या नवीन नियमांचा फायदा त्या सर्व ग्राहकांना मिळेल ज्यांना टीव्ही बघायला आवडते.

https://img.hi.91mobiles.com/uploads/2019/09/oneplus-tv-main-image.jpg

ट्राईच्या नवीन नियमानंतर केबल ऑपरेटर आपल्या ग्राहकांकडून फ्री चॅनल्ससाठी प्रतिमाह 160 रुपयांपेक्षा जास्त पैसे घेऊ शकणार नाही. इतकेच नव्हे तर 12 रुपयांपेक्षा जास्त किंमत असणारे सर्व टीव्ही चॅनेल कोणत्याही बुकेचा भाग असणार नाहीत. जर ग्राहकनाची इच्छा असेल तर ते हे चॅनल्स घेऊ शकतील. याआधी ग्राहकांना जबरदस्तीने 12 रुपयांपेक्षा जास्त किंमत किंमत असणारे टीव्ही चॅनेल बुके मध्ये घ्यावे लागत होते.

साल 2019 मध्ये भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण म्हणजे ट्राईने केबल आणि डीटीएच सब्सक्राइबर्सना आपल्या आवडीचे चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. या नवीन नियमानंतर ग्राहक आपल्या वापरानुसार, चॅनेलची लोकप्रियता तसेच भाषेच्या आधारावर निवड करू शकत होते. यामुळे त्यांना फक्त त्याच चॅनेल्ससाठी पैसे द्यावे लागतात जे त्यांना बघायचे आहेत. यात किड्स चॅनेल्स, मूवीज, न्यूज, इंफोटेंमेंट व स्पोर्ट्स चॅनेल्स सह प्रादेशिक भाषांचा पण समावेश आहे.

त्याआधी केबल ऑपरेटर व डीटीएच सर्विसेजकडून ग्राहकांना मंथली पॅकेज मिळायचे. या पॅकेज मध्ये कोणत्या चॅनेलची किंमत किती आहे तसेच कोणता चॅनेल फ्री आहे हि माहिती कधीही यूजर्सना मिळत नसे. पण आता असे होत नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here