Tecno ने आपल्या Pova सीरीजमधील स्मार्टफोन पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. या अंतर्गत नवीन मोबाईल TECNO POVA 6 Neo 5G भारतात लाँच झाला आहे. या डिव्हाईसची खास गोष्ट म्हणजे यात अनेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स फिचर्स आहेत. हा 108 मेगापिक्सेल कॅमेरा, विस्तारित तंत्रज्ञानाच्या मदतीने 16GB पर्यंत रॅम, मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिपसेट, 5000mAh बॅटरी अशा अनेक शक्तिशाली स्पेसिफिकेशन ने सुसज्ज आहे. चला, पुढे त्याची किंमत आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
TECNO POVA 6 Neo 5G ची किंमत आणि उपलब्धता
- TECNO POVA 6 Neo 5G भारतात दोन मेमरी पर्यायांमध्ये लाँच झाला आहे.
- डिव्हाईसच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे.
- टॉप मॉडेल 8 जीबी रॅम + 256 जीबी ची किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
- दोन्ही मॉडेल्सवर 1,000 रुपयांची लाँच ऑफर बँक डिस्काऊंट दिली जात आहे.
- ग्राहकांना यासाठी मिडनाईट शॅडो, अझूर स्काय आणि अरोरा क्लाऊड असे तीन रंग मिळतील.
- हे ॲमेझॉन साईट आणि इतर रिटेल आऊटलेट्सवर 14 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
TECNO POVA 6 Neo 5G चे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले
टेक्नोच्या POVA 6 Neo 5G या नवीन मोबाईलमध्ये 6.67 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. त्यावर वापरकर्त्यांना 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 90 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 480 निट्स पर्यंतचा ब्राईटनेस आणि 20:09 आस्पेक्ट रेशो मिळतो.
चिपसेट
TECNO POVA 6 Neo 5G मध्ये कंपनीने मजबूत परफॉर्मन्ससाठी 6 नॅनोमीटर प्रक्रियेवर तयार केलेला मीडियाटेक डायमेंसिटी 6300 5G चिपसेट ऑफर केला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना 2.4GHz पर्यंतची हाय क्लॉक स्पीड मिळते. इतकंच नाही तर डिवाईसमध्ये ग्राफिक्ससाठी माली जी57 एमसी2 जीपीयू बसवण्यात आला आहे. एकूणच पाहिले तर हा मल्टीटास्किंग आणि सामान्य ऑपरेशनसाठी चांगला आहे.
स्टोरेज आणि रॅम
मोबाईलमध्ये फोटो सेव्ह करण्यासाठी, ॲप्लिकेशन्स चालवण्यासाठी आणि इतर डेटा सेव्ह करण्यासाठी 8 जीबी पर्यंतची रॅम आणि 256 जीबी पर्यंतचे इंटरनल स्टोरेज आहे. यासह, 8 जीबी एक्सटेन्डेड तंत्रज्ञानाचा सपोर्ट दिला आहे. ज्याच्या मदतीने एकूण 16GB पर्यंत रॅमच्या शक्तीचा वापर करता येईल. याशिवाय इंटरनल स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट लावले आहे. ज्याद्वारे स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येते.
कॅमेरा
कॅमेरा फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन TECNO POVA 6 Neo 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी असलेली दुसरी लेन्स मिळत आहे. या कॅमेऱ्यामध्ये 3X लॉसलेस इन सेन्सर झूमची सुविधा आहे. त्याचवेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी मोबाईलमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.
बॅटरी आणि चार्जिंग
टेक्नोने बजेट रेंजमध्ये सादर केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे. ही मोठी बॅटरी चार्ज करण्यासाठी ब्रँडद्वारे 18 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जात आहे. ब्रँडचा दावा आहे की हा स्मार्टफोन 19.7 तास म्युझिक आणि 31.25 तासांचा कॉलिंग टाईम देऊ शकतो.
इतर
TECNO POVA 6 Neo 5G मध्ये ड्युअल सिम 5G, वाय-फाय, ब्लूटूथ, इन्फ्रारेड सेन्सर, एनएफसी, लाईट सेन्सर, एआय सूट (AIGC, एआय मॅजिक इरेजर, एआय कटआऊट, एआय वॉलपेपर, एआय आर्टबोर्ड, आस्क एआय), 5 वर्षांपर्यंत लॅग फ्री परफॉर्मन्स सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.
ओएस
ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर TECNO POVA 6 Neo 5G स्मार्टफोन नवीनतम अँड्रॉईड 14 आधारित HiOS 14.5 वर काम करतो.
वजन आणि डायमेन्शन
वजन आणि डायमेन्शन बद्दल बोलायचे झाल्यास ब्रँडनुसार नवीन टेक्नो डिव्हाईस 165.4 x 76.8 x 7.8 मिमी आणि 192.3 ग्रॅमचा आहे.