Infinix घेऊन येत आहे भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन, किंमत असेल 10,000 रुपयांपेक्षा कमी

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

Infinix बद्दल गेल्याच आठवड्यात हि बातमी समोर आली होती कि हा टेक ब्रँड भारतात आपली नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात करणार आहे. मीडिया रिपोर्ट् मध्ये खुलासा झाला होता कि नवीन सीरीज सोबतच इनफिनिक्स भारतात आपला पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन पण आणेल. तसेच आता या बातमीला दुजोरा देत 91मोबाईल्सने आपल्या सूत्रांकडून माहिती मिळवली आहे कि Infinix चा हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च केला जाईल. यावरून स्पष्ट झाले आहे कि Infinix चा हा आगामी मोबाईल भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन असेल.

91मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्सकडून माहिती मिळाली आहे कि Infinix पुढल्या महिन्यात आपला नवीन पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल आणि या डिवाईसची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. हा स्मार्टफोन इनफिनिक्सचा नाही तर संपूर्ण भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन असेल. सूत्रांकडून अशी बातमी पण मिळाली आहे कि Infinix नंतर Tecno पण भारतात आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणेल. विशेष म्हणजे इनफिनिक्स आणि टेक्नो दोन्ही ब्रँड चीनी कंपनी Transsion Holdings Limited चे आहेत.

Infinix आपला हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन कोणत्या नावाने बाजारात येईल हि माहिती समोर आली नाही पण मीडिया रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा आगामी डिवाईस मीडियाटेकच्या चिपसेट सह येईल. रिपोर्टनुसार या पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या मोबाईल सह Infinix एक नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात करेल. Infinix च्या या नवीन सीरीज आणि याअंतर्गत लॉन्च होणारे डिवाईसेज ‘सेल्फी सेंट्रिक’ स्मार्टफोन म्हणून लॉन्च केले जातील.

Infinix S5 Lite

Infinix S5 Lite चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 760 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. Infinix S5 Lite एंडरॉयड 9 पाई आधारित एक्सओएस 5.5 वर सादर केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडच्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

Infinix S5 Lite 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी साठी या फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि एक क्यूवीजीए सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी Infinix S5 Lite 16 मेगापिक्लच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Infinix S5 Lite डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. भारतीय बाजारात Infinix S5 Lite 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध आहे. Infinix S5 Lite ब्लॅक, श्यान आणि वॉयलेट कलर मध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here