फक्त 3999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आईटेलचा एंडरॉयड गो आधारित 4G फोन itel A25

टेक कंपनी Itel कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन्स घेऊन येते. ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर या ब्रँडच्या स्मार्टफोन्सची विक्री खूप होते आणि फोनची लो प्राइस हिच्या फॅन बेसची मुख्य यूएसपी आहे. Itel ने सप्टेंबर मध्ये भारतीय बाजारात आपल्या ‘ए सीरीज’ अंतर्गत A46 स्मार्टफोन लॉन्च केला होता जो 4,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला होता. तर आज आईटेलने अजून एक नवीन स्मार्टफोन itel A25 भारतीय बाजारात आणला आहे. कंपनीने हा फोन फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

iTel A25

स्वस्त स्मार्टफोन बनवण्यात तरबेज असलेल्या टेक कंपनी Itel ने आईटेल ए25 फक्त 3,999 रुपयांमध्ये इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला आहे जो नॉच लेस डिजाईन वर बनला आहे. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन जुन्या डिजाईन वर सादर केला गेला आहे ज्यात डिस्प्लेच्या वरच्या आणि खालच्या बाजूला रुंद बॉडी पार्ट आहे. फोन मध्ये नॅरो साईड बेजल्स देण्यात आले आहेत तसेच खालच्या बॉडी पार्ट वर नेविगेशन की आहेत. डिस्प्लेच्या वरच्या भागात बॉडी पार्ट वर सेल्फी कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश लाईट सह स्पीकर देण्यात आला आहे.

कंपनीने itel A25 5.0 इंचाच्या आईपीएस फुलस्क्रीन एचडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो 450निट्स ब्राइटनेस देतो. itel A25 एंडरॉयड 9 पाई आधारित गो एडिशन वर आणला आहे जो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या क्वॉड कोर प्रोसेसर वर चालतो. फोन मध्ये एंडरॉयड गो असल्यामुळे यात गूगल ऍप्सचे गो वर्जन इंस्टाल करता येतील जे कमी मेमरी वर पण फास्ट व लॅग फ्री चालतात.

itel A25 भारतीय बाजारात 1 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडीने 32 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता आईटेल ए25 सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी हा फोन फ्लॅश लाईट असलेल्या 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

itel A25 बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4G वोएलटीई ला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे बॅकअपसाठी itel A25 मध्ये 3,030एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन इंग्लिश व हिंदी सह इतर भारतीय भाषांमध्ये काम करू शकतो. itel A25 भारतात Gradation Blue, Sea Blue आणि Purple कलर मध्ये आला आहे जो फक्त 3,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here