टाटाची Punch EV येणार भारतात; अधिकाऱ्यांनी केली पुष्टी

भारतातील इलेक्ट्रिक कार सेगमेंटवर Tata Motors ची चांगलीच पकड आहे. कंपनीच्या ईव्ही पोर्टफोलियोमध्ये सध्या चार कार्स आहेत. ज्यात Tata Tiago EV, Tata Tigor EV, Tata Nexon EV Prime आणि Tata Nexon EV MAX चा समावेश आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एका मॉडेलची भर पडणार आहे. Tata Motors च्या आगामी Tata Punch EV बद्दल समोर आलेल्या सर्व रिपोर्ट्सवर पूर्णविराम लावत कंपनीनं या बातमीला दुजोरा दिला आहे. ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक मायक्रो-एसयूव्ही कार असेल. Tata Passenger and Electric Mobility चे टॉप एग्जिक्यूटिव Vivek Srivatsa यांनी टाटा पंच ईव्ही प्रोजेक्ट कन्फर्म केला आहे आणि लवकरच पंच ईव्ही लाँच केली जाईल असं सांगितलं आहे.

लवकरच भारतात येणार Tata Punch EV

वर सांगितल्याप्रमाणे Tata Motors नं Tata Punch ICE-पावर्ड छोट्या SUV वर आधारित Tata Punch EV प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवला आहे. इलेक्ट्रिक टाटा पंच भारतातील पहिली ईव्ही मायक्रो-एसयूव्ही बनू शकते आहे आणि किंमतच्या बाबतीत टाटाच्या टियागो ईव्ही आणि टिगोर ईव्हीच्या मध्ये ही सादर केली जाईल, अशी चर्चा आहे. हे देखील वाचा: अँड्रॉइडचा बाहुबली येतोय! लाँचपूर्वीच OnePlus 11 चे ‘ए टू झेड’ स्पेसिफिकेशन्स आले समोर, जाणून घ्या पावर

मीडिया रिपोर्ट्स नुसार, Vivek यांनी सांगितलं आहे की Tata Punch EV ‘pipeline’ मध्ये आहे, जी येत्या काळात सादर केली जाऊ शकते. परंतु कंपनीनं या प्रोडक्टच्या लाँच डेट बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. परंतु ही ई-कार पुढील वर्षी 2023 च्या पहिल्या मिड मध्ये सादर केला जाऊ शकतो.

Tata Punch EV Tata च्या ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित असेल जो एक इलेक्ट्रिक पावरट्रेनला सामावून ठेऊ शकतो. Tata Punch EV मध्ये हाई-वोल्टेज Ziptron इलेक्ट्रिक पावरट्रेनचा वापर केला जाईल जो Tata Tiago, Tata Tigor आणि Tata Nexon मध्ये देखील आहे. हे देखील वाचा: New OTT releases this week: बहुचर्चित ‘थँक गॉड’ आणि पिचर्स येतायत ओटीटीवर, पाहा संपूर्ण यादी

तसेच पावरट्रेन ऑप्शनच्या आधारावर टाटा पंच ईव्हीची किंमत 10 – 13 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या आसपास असू शकते. Tata Motors ही नवीन इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV आणि एंट्री-लेव्हल Tata Nexon EV Prime च्या मध्ये सादर करू शकते. तसेच Tata Punch EV भारतात Citroen eC3 EV मायक्रो-एसयूव्हीला आव्हान देऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here