Smartphone Heating: तुमचा Mobile Phone गरम होतो? मोठं नुकसान होण्याआधीच आताच घ्या ही काळजी

Smartphone Heating च्या समस्येला जवळपास सर्वच मोबाइल फोन युजर्सना कधी कधी तरी सामोरे जावे लागते. फोनमध्ये गेम खेळताना किंवा बराच वेळ चॅटिंग तसेच इंटरनेट सर्फिंग दरम्यान स्मार्टफोन थोडा गरम झाल्याचे जाणवते. अनेकदा फोनवर बोलताना देखील कानाला लावलेला मोबाइल गरम (smartphone heating issue) होतो. बऱ्याचदा स्मार्टफोन युजर याकडे दुर्लक्ष करतात परंतु फोनची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे. मोबाइल फोन गरम होण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष कारण धोकादायक ठरू शकतं. जर तुमचा स्मार्टफोन देखील गरम होत असेल तर पुढे आम्ही mobile phone heating problem and solution ची माहिती दिली आहे.

मोबाइल का तापतो

सर्वप्रथम Smartphone Heating ची समस्या का होते हे जाणून घेऊया. मोबाइल फोन गरम होण्याचे एकमेव कारण त्याची बॅटरी असते. बॅटरी गरम होण्याची मात्र अनेक कारणे आहेत. कधीकधी फोनचा कम्यूनिकेशन यूनिट, प्रोसेसर आणि कॅमेरा देखील फोन तापण्यास कारणीभूत ठरू शकतात परंतु बॅटरीच्या तुलनेत अशा गोष्टी कमी घडतात. उन्हाळ्यात किंवा वातावरण तापल्यामुळे फोन प्रोसेसिंगमध्ये हिटिंग प्रॉब्लम कित्येक पटीनं वाढतो. परंतु काही सवयी बदलून ही समस्या कमी करता येऊ शकते. हे देखील वाचा: How To Youtube Shorts Videos: पाहा युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करण्याच्या सर्वात सोप्या ट्रिक्स

Smartphone Heating Issue

1. किती टक्के चार्ज झाला फोन

स्मार्टफोन कधीही फुल चार्ज करू नये. मोबाइल पूर्णपणे 100 टक्के चार्ज करण्याची सवय सोडून द्या आणि फोन 90 टक्क्यांपर्यंत चार्ज झाल्यावर चार्जिंग बंद करा. तसेच फोनची बॅटरी 20 टक्क्यांपेक्षा खाली जाऊ देऊ नका. शक्य असल्यास 20 टक्क्यांच्या आसपास बॅटरी ड्रेन होताच फोन चार्जिंगवर लावा. जास्त हाय आणि जास्त लो पावर बॅटरी हेल्थवर परिणाम करते आणि त्यामुळे ओव्हरहिटिंगची समस्या उद्भवते.

2. फोन चार्ज करण्याची पद्धत

मोबाइल युजर्स रात्री झोपताना फोन चार्जिंगला लावतात आणि उठल्यावर चार्जिंग बंद करतात. त्यामुळे फोन ओव्हर नाईट चार्ज होतो. चार्जिंग टाइम ट्रॅक होत नाही आणि बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर देखील चार्जिंग ऑन असते. तसेच बेड, उशी किंवा गादीवर फोन ठेऊन चार्ज करू नये. चार्जिंग दरम्यान बॅटरीमधून उष्णता बाहेर पडते आणि कपड्यांमुळे ती आतच अडकते. यामुळे ओव्हरहिट सोबतच फोनमध्ये आग लागण्याची आणि बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता वाढते.

3. स्टाईलिश फोन कव्हरची गरज आहे का

फक्त चार्जिंग दरम्यान नव्हे तर इतर वेळी देखील फोनच्या बॅटरी तसेच प्रोसेसरमधून उष्णता बाहेर येत असते. स्टाईसाठी लावलेला मोबाइल कव्हर फोनला पूर्णपणे पॅक करतो. त्यामुळे मोबाइल कव्हरमध्ये फोन हिट अडकून राहते. उन्हात गेल्यावर किंवा फोन चार्जिंगला लावताना कव्हर काढून टाका.

4. ऑरिजनल चार्जर आणि यूएसबीच वापरा

स्मार्टफोन सोबत मिळालेला चार्जर व यूएसबी तुटल्यावर ऑरिजनलसाठी जास्त पैसे देणे कोणालाच आवडत नाही. फोन कोणत्याही चार्जर आणि यूएसबीनं चार्ज करता येतो. परंतु स्वस्त आणि लोकल वस्तू वापरणं महागात पडू शकतं. यामुळे बॅटरी हीटिंगची समस्या वाढते तसेच स्लो चार्जिंग व बॅटरी खराब झाल्यामुळे स्फोट होण्याचा धोका वाढतो.

5. फालतू अ‍ॅप्स काढून टाका

स्मार्टफोन युजर फोनमध्ये अनेक अ‍ॅप्स डाउनलोड आणि इन्स्टाल करतात आणि वापरत नाहीत. हे अ‍ॅप्स फोनमध्ये राहून लोकेशन, डेटा, बॅटरी, कॅमेरा, माइक इत्यादी अ‍ॅक्सेस करतात. बॅकग्राउंडमध्ये चालणारे अ‍ॅप्स स्टेट प्रोसेसर वापरतात आणि त्याचा परिणाम बॅटरीवर होतो. या अनावश्यक अ‍ॅपमुळे फोन स्लो होतो तसेच हिटिंगची भीती देखील असते. असे अ‍ॅप्स ज्यांचा तुम्ही जास्त वापर करत नाही ते डिलीट करा आणि फोनचा स्टोरेज आणि रॅम देखील वाचवा.

6. डिस्प्लेमध्ये ऑटो-ब्राइटनेस आवश्यक

सध्या मोबाइल फोन्स फक्त मोठी स्क्रीन नसते तर हाय रिफ्रेश रेट, निट्स ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट रेशियो असलेले डिस्प्ले येतात. त्यामुळे स्क्रीन आर्कषक दिसते परंतु ही मोबाइल स्क्रीन देखील फोन हिटिंगला कारणीभूत ठरते. डिस्प्लेची ब्राइटनेस फुल ठेवल्यास फोन गरम होऊ शकतो, त्यामुळे फोनमध्ये ऑटो-ब्राइटनेस फीचर ऑन ठेवा. तसेच फोनमध्ये स्क्रीन टाइमआउट देखील कमी सेकंड्सवर सेट केल्यास बॅटरी वाचते तसेच हीटिंगची शक्यता कमी होते.

7. कॅमेरामुळे तापतो फोन

स्मार्टफोनचा कॅमेरा देखील अनेकदा मोबाइल हीटिंगचे कारण बनतो. सतत फोनमध्ये फोटोज काढल्यावर किंवा मोठा व्हिडीओ बनवल्यास कॅमेरा आणि फोन गरम होतो. त्यामुळे वारंवार कॅमेरा वापरणं कमी करा, मोठे व्हिडीओज शूट करणं टाळा.

8. व्हायब्रेशन कमी ठेवा

कॉल किंवा मेसेज आल्यावर रिंगटोन वाजते तसेच फोन व्हायब्रेट होतो. तसेच मेसेजमध्ये देखील फोन व्हायब्रेशनच्या माध्यमातून नोटिफिकेशन्स पाठवतो. वारंवार व्हायब्रेट करण्यासाठी फोनला पावरचा वापर करावा लागतो आणि याचा परिणाम बॅटरी आणि प्रोसेसरवर होतो. व्हायब्रेशनची भूमिका जास्त नसली तरी गरज नसल्यास फोनचं व्हायब्रेशन बंदच करा.

9. हे मोड्स आहेत आवश्यक

फोन बॅटरी जेव्हा जास्त कमी असते तेव्हा प्रोसेसरचा लोड देखील वाढतो. लो बॅटरी दरम्यान लोकेशन, जीपीएस, डेटा व सिंक इत्यादी बंद केल्यास बॅटरीचा वापर कमी होईल आणि जास्त दबावामुळे फोनची बॅटरी गरम देखील होणार नाही. त्यासाठी फोनमधील Power saving mode व असेच अन्य ऑप्शन ऑन केल्यास बॅटरीवर जास्त जोर पडणार नाही आणि फोन गरम होणार नाही. हे देखील वाचा: Chienese Smartphones नको? मग हे आहेत बेस्ट नॉन चिनी मोबाइल; शक्तिशाली प्रोसेसरसह शानदार कॅमेरा

10. अपडेट करत राहा

फोन नेहमी नव्या व्हर्जनवर अपडेट करणं आवश्यक आहे. त्यामुळे फोन स्मूद आणि फास्ट राहतो तसेच बॅटरी हेल्थ चांगली राहते. अनेकदा आउटडेटेड व्हर्जन देखील प्रोसेसरला भारी पडतो तसेच अनेक जुने फीचर्स phone heating चे कारण बनतात. फोन व अ‍ॅप्स अपडेट केल्यावर सर्वकाही रिफ्रेश होते तसेच हीटिंग देखील कमी होते. अ‍ॅप्स आणि ऑपरेटिंग सिस्टम अपडेट केल्यास एरर, ग्लिच आणि बग ठीक होतात आणि फोन स्मूद, फास्ट आणि सुरक्षित होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here