Samsung ने जेव्हापासून इंटरनेशनल मार्केट मध्ये आपल्या गॅलेक्सी ए सीरीज अंतर्गत Galaxy A51 आणि Galaxy A71 लॉन्च केले आहेत. तेव्हापासून या दोन्ही स्मार्टफोन्सची वाट इंडियन मोबाईल यूजर्स करत आहेत. 91मोबाईल्सने या सीरीज संबंधित अनेक एक्सक्लूसिव बातम्या दिल्या आहेत ज्यात गॅलेक्सी ए51 आणि ए71 चे वेरिएंट्स आणि त्यांच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. आता सॅमसंगने अधिकृत घोषणा केली आहे कि कंपनी भारतात Galaxy A51 आणि Galaxy A71 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Samsung ने गॅलेक्सी ए सीरीजच्या नवीन स्मार्टफोन्सचे प्रोडक्ट पेज कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर प्रसिद्ध केले आहे.
Samsung India ने कपंनीच्या माइक्रोसाइट वर ‘Galaxy A’ नावाने नवीन प्रोडक्ट पेज बनवले आहे. कंपनीने या प्रोडक्ट पेज वर Awesome is for everyone लिहिण्यात आले आहे. प्रोडक्ट पेज वर कंपनीने स्मार्टफोन फोटो पण शेयर केला आहे ज्यात फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे. फोटो मध्ये पंच-होल डिस्प्ले दिसत आहे ज्यात होल डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मधोमध आहे. या प्रोडक्ट पेज आणि फोटोने स्पष्ट केले आहे कि आता गॅलेक्सी ए सीरीजचा नवीन फोन Galaxy A51 आणि Galaxy A71 लवकरच बाजारात येणार आहेत.

Samsung Galaxy A सीरीजच्या या प्रोडक्ट पेज वर फोनच्या फ्रंट पॅनलच्या फोटो सोबत रियर कॅमेरा प्लेटमेंट पण दाखवण्यात आली आहे जो L-शेप मध्ये आहे. वियतनाम मध्ये लॉन्च झालेले Galaxy A51 आणि Galaxy A71 अश्याच रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. प्रोडक्ट पेज बद्दल बोलायचे तर इथे फोन मध्ये Awesome Camera, Awesome Screen आणि Awesome Battery मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सॅमसंगने अधिकृतपणे गॅलेक्सी ए51 आणि ए71 स्मार्टफोनसाठी ‘Notify Me’ बटण सादर केले आहे.
91मोबाईल्सला दिल्ली/एनसीआर च्या रिटेल स्टोर्स वर Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 चा पोस्र्स मिळाले आहेत. हे दोन्ही वेगवेगळे आहेत ज्यात एकात Galaxy A51 तर दुसऱ्यात Galaxy A71 स्मार्टफोन लिहिण्यात आले आहे. या पोस्टर्स वर फक्त फोनचे नाव नाही तर फोन्सचे फोटोज पण आहेत. तसेच आम्हाला ऑफलाइन रिटेल सोर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार Samsung Galaxy A51 भारतीय बाजारात 22,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल तर Galaxy A51 ची किंमत 29,990 रुपये असेल.
Samsung Galaxy A51
गॅलेक्सी ए51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.5-इंच, फुल एचडी+ (1080 x2400) सुपर AMOLED इनफिनिटी-O डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन सॅमसंगच्या Exynos 9611 चिपसेट ऑक्टा कोर (क्वाड 2.3GHz + क्वाड 1.7GHz) प्रोसेसर सह येतो. यात 4GB रॅम, 6GB रॅम आणि 8GB रॅम ऑप्शन सह 64GB व 128GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 48MP, F2.0 सह डेप्थ मेन सेंसर, 5MP, F2.2 मेक्रो सेंसर, 5MP, F2.4 अल्ट्रा-वाइड आणि 12MP, F2.2 सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 15W फास्ट चार्जिंग सह येते.
Samsung Galaxy A71
Galaxy A71 पाहता यात 6.7-इंचाचा फुल एचडी+ (1080 x2400) सुपर ऐमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा कोर (डुअल 2.2GHz + हेक्सा 1.8GHz) प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 6जीबी रॅम व 8जीबी रॅम सह 128जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. हि स्टोरेज तुम्ही माइक्रोसएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवू शकता.
फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 64MP चा मेन डेप्थ सेंसर F1.8, 5MP मेक्रो सेंसर F2.2, 5MP अल्ट्रा वाइड F2.4 आणि 12MP, F2.2 सेंसर आहे. तसेच फ्रंट कॅमेरा फोन मध्ये 32MP चा आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंग सह येते.















