6000mAh बॅटरी आणि 6GB रॅम असलेला Samsung Galaxy M30s झाला स्वस्त, फक्त 14999 रुपयांमध्ये मिळेल हा दमदार फोन

Samsung ने गेल्यावर्षी आपल्या गॅलेक्सी एम सीरीज अंतर्गत Galaxy M30s स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन 6,000एमएएच च्या ताकदवान बॅटरीला सपोर्ट करतो ज्यमुळे हा प्रसिद्ध झाला होता. काही दिवसांपूर्वी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर आयोजित सेलसाठी हा स्मार्टफोन कमी किंमतीत विकला गेला होता. तर आता आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंगने Samsung Galaxy M30s ची किंमत कमी केली आहे. कंपनीने फोनची किंमत 2,000 रुपयांनी कमी केली आहे ज्यामुळे हा डिवाईस अमेझॉन सोबतच सॅमसंगच्या वेबसाइट वरून पण कमी किंमतीत विकत घेता येईल.

Samsung Galaxy M30s भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सॅमसंगने गॅलेक्सी एम30एस चा 4 जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता तसेच फोनचा 6 जीबी रॅम वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये आणला होता.

सॅमसंगने आता Samsung Galaxy M30s च्या 6 जीबी रॅम वेरिएंटची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे ज्यामुळे हा डिवाईस 14,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच फोनच्या 4 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे ज्यानंतर हा फोन वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung Galaxy M30s नवीन किंमतीत ब्लू, ब्लॅक आणि व्हाईट कलर मध्ये अमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर सेलसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M30s

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स पाहता फोन इनफिनिटी यू-डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. या फोन मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रोसेसिंग साठी Galaxy M30s मध्ये ऑक्टा कोर 2.3 गीहार्ट्ज + 1.7 गीगाहर्ट्ज सह कंपनीचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. फोन दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट 4+64 जीबी आणि 6+128 जीबी मध्ये सादर झाला आहे.

Samsung Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमारी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8-मेगापिक्सलच्या तिसऱ्या सेंसर सह येतो. सेल्फी साठी Galaxy M30s मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची दमदार बॅटरी मिळेल जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट दिला जाईल जो बॅटरी वेगाने चार्ज करण्यास मदत करेल. तसेच फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here