Infinix बाबत अलीकडेच खुलासा झाला होता कि हा टेक ब्रँड भारतात आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात करणार आहे आणि नवीन सीरीजच्या व्यतिरिक्त कंपनी भारतीय बाजारात आपला पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन पण आणेल. 91मोबाईल्सने आपल्या सूत्रांकडून बातमी मिळवली होती कि Infinixचा हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा पण कमी किंमतीत लॉन्च केला जाईल. तसेच आता एका मीडिया रिपोर्ट मध्ये इनफिनिक्सच्या या आगामी स्मार्टफोनच्या नावाचा पण खुलासा झाला आहे. रिपोर्ट मधून समोर आले आहे कि इनफिनिक्सचा हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात Infinix S5 Pro नावाने लॉन्च होईल.
Infinix S5 Pro च्या नावाची माहिती द मोबाईल इंडियन वेबसाइटच्या बातमीमधून मिळाली आहे. या वेबसाइटने सूत्रांच्या आधारावर लिहिले आहे कि इनफिनिक्स आपला आगामी पॉप-अप सेल्फी कॅमेरा मोबाईल Infinix S5 Pro नावाने लॉन्च करेल. रिपोर्टनुसार हा आगामी डिवाईस मीडियाटेकच्या चिपसेट वर चालेल. विशेष म्हणजे इनफिनिक्स एस5 प्रो या कंपनीचा पहिला पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन असेल. 91मोबाईल्सने सांगितले होते कि हा फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च केला जाईल. अर्थात् Infinix S5 Pro भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन म्हणून एंट्री घेईल.

91मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार Infinix S5 Pro पुढल्या महिन्यात इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होईल. तसेच Infinix के बाद Tecno पण भारतात आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणेल. विशेष म्हणजे इनफिनिक्स आणि टेक्नो दोन्ही ब्रँड चीनी कंपनी Transsion Holdings Limited चे आहेत. मीडिया रिपोर्टनुसार Infinix एक नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात पण करेल ज्या अंतर्गत लॉन्च होणारे डिवाईसेज ‘सेल्फी सेंट्रिक’ स्मार्टफोन म्हणून लॉन्च केले जातील. हे फोन लो बजेट मधेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील.
Infinix S5 Lite
इनफिनिक्स आपले प्रोडक्ट्सच्या किंमती आक्रमकपणे सादर करते. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या या ब्रँडचे स्मार्टफोन कमी किंमतीतच लॉन्च केले जातात. इनफिनिक्सच्या लेटेस्ट स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर Infinix S5 Lite पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो तसेच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर 7,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Infinix S5 Lite मध्ये 1600 x 760 पिक्सल रेज्ल्यूशन असेलला 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित एक्सओएस 5.5 वर सादर केला गेला आहे जो मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफीसाठी या फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि एक क्यूवीजीए सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी Infinix S5 Lite 16 मेगापिक्लचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.














