इनफिनिक्सने भारतात गेल्या वर्षी एप्रिल मध्ये Infinix Smart 3 Plus लॉन्च केला होता. आता बातमी समोर येत आहे कि कंपनी आपली ‘स्मार्ट’ सीरीज वाढवत नवीन फोन सादर करण्याची योजना बनवत आहे. हा नवीन फोन इनफिनिक्स स्मार्ट 4 प्लस नावाने सादर केला जाईल. अजूनतरी कंपनीने या डिवाइसच्या लॉन्चिंग बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण अधिकृत घोषणेच्या आधी हा डिवाइस गूगल प्ले सपोर्ट लिस्ट आणि गूगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये दिसला होता.
लिस्टिंग मध्ये डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण समोर आली आहे. लिस्टिंगनुसार Infinix Smart 4 Plus वॉटरड्रॉप नॉच सह HD+ रिजोल्यूशन डिस्प्ले (720 x 1,640 पिक्सल) सह येईल. तसेच डिवाइसची स्क्रीन डेंसिटी 320 DPI असेल. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो P22 प्रोससेर (4x ARM Cortex-A53 cores clocked at 1800MHz आणि 4x ARM Cortex-A53 cores clocked at 1500MHz) असेल. डिवाइस मध्ये 3GB रॅम दिला जाईल. आशा आहे कि Infinix Smart 4 Plus एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो.
तसेच फोन मध्ये लेटेस्ट एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम दिली जाईल. या स्पेसिफिकेशन्स व्यतिरिक्त लिस्टिंग मध्ये इतर कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच कंपनीने पण अधिकृत माहिती दिली नाही.
कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतात इनफिनिक्स हॉट 9 आणि इनफिनिक्स हॉट 9 प्रो सादर केला होता. दोन्ही स्मार्टफोन मध्ये होल-पंच डिस्प्ले डिजाइन आणि हीलियो पी22 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही फोन मध्ये 6.6-इंचाच एचडी+ (720×1600 पिक्सल) होल-पंच एलसीडी आईपीएस डिस्प्ले आहे.
फोन मध्ये 2.0 गीगाहर्ट्ज हीलियो पी22 ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 4 जीबी रॅम मिळत आहे. इंटरनल स्टोरेज बद्दल बोलायचे तर ती 64 जीबी असेल, पण यात माइक्रोएसडी कार्डचा सपोर्ट 256 जीबी पर्यंत मिळेल.
वीडियो














