Motorola ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या ‘जी सीरीज’ अंतर्गत Moto G9 स्मार्टफोन लॉन्च केला होता जो 11,499 रुपयांच्या बेस किंमतीत बाजारात आला होता. मोटो जी9 लॉन्च सोबतच या सीरीजच्या जाऊन एका आगामी मोबाईल Moto G9 Plus च्या बातम्या पण सतत समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी मोटो जी9 प्लस चा फोटो इंटरनेट वर लीक झाला होता तर आता हा फोन एका रिटेल वेबसाइट वर पण लिस्ट करण्यात आला आहे, ज्यात फोनच्या माहितीचा पण खुलासा झाला आहे.
Moto G9 Plus स्मार्टफोन यूरोपियन वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे. कंपनीने अजूनतरी अधिकृतपणे या फोनची माहिती दिली नाही पण लॉन्चच्या आधीच मोटो जी9 प्लस रिटेलर वेबसाइट वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगची माहिती टिपस्टर रोलांड क्वॉन्डट यांनी दिली आहे. लिस्टिंगची चर्चा सुरु होताच या रिटेलरने फोन पुन्हा वेबसाइट वरून लिस्टींग काढून टाकली पण तोपर्यंत फोनचे सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले होते.
Moto G9 Plus
मोटोरोलाच्या या आगामी स्मार्टफोन मोटो जी9 प्लस बद्दल बोलायचे झाले तर वेबसाइट वर हा मोबाईल पंच-होल डिस्प्ले डिजाईन सह लिस्ट केला गेला होता. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच स्क्रीनच्या वर डावीकडे छोटासा होल आहे. लिस्टिंग मध्ये खुलासा झाला आहे कि हा स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.81 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल.
Moto G9 Plus या वेबसाइट वर एंडरॉयड 10 ओएस सह दाखवण्यात आला आहे ज्या सोबत फोन मध्ये 4 जीबी रॅम असल्याचे सांगण्यात आले आहे. लिस्टिंग नुसार मोटो जी9 प्लस च्या या वेरिएंट मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता पण येईल. लिस्टिंग मध्ये फोनच्या प्रोसेसरचा उल्लेख केला गेला आहे.
लिस्टिंग मध्ये या मोटोरोला फोन मध्ये 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप असल्याचे सांगण्यात आले आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये इतर सेंसर तसेच फोनचा सेल्फी कॅमेरा किती मेगापिक्सलचा असेल हे अजून स्पष्ट झाले नाही. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि Moto G9 Plus स्मार्टफोन 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करेल जो 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
फोन मध्ये डुअल सिम, 4जी वोएलटीई व अन्य कनेक्टिविटी फीचर्स असतील तसेच याचे डायमेंशन 169.98 x 78.1 x 9.69एमएम आणि वजन 223 ग्राम सांगण्यात आले आहे. Moto G9 Plus ची किंमत या वेबसाइट वर 235 यूरो दाखवण्यात आली आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 20,400 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे कि पुढील काही दिवसांत मोटोरोला अधिकृतपणे मोटो जी9 प्लस सादर करेल.
















