वीवो घेऊन येत आहे Samsung च्या चिपसेट वर चालणारा फोन Vivo G1

Vivo ने अलीकडेच Vivo Y50 स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केल्यानंतर ब्रँडचा एक नवीन फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर लिस्ट झाला होता. या फोनच्या नावाची माहिती तर नव्हती मिळाली पण फोनचा मॉडेल नंबर Vivo V1990A होता. या लिस्टिंग मध्ये फोनचा फोटो व काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले होते. तर आता वीवोच्या अजून एका नवीन फोनची माहिती समोर येत आहे जिचे नाव Vivo G1 सांगण्यात आले आहे. या नवीन बातमीवरून समजले आहे कि वीवो एक नवीन ‘वीवो जी’ सीरीज बाजारात आणण्याची तयारी करत आहे.

Vivo G1 ची माहिती चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनाच्या माध्यमातून समोर आई आहे. विशेष म्हणजे टेना व्यतिरिक्त वीवो जी1 चा उल्लेख माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर झाला आहे. वेईबो वर एका पोस्टच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे कि वीवो नवीन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे जिचे नाव वीवो जी सीरीज असेल. लीकनुसार सीरीज अंतर्गत लॉन्च होणाऱ्या सर्वात पहिल्या स्मार्टफोनचे नाव Vivo G1 असेल आणि हा डिवाईस मे मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Vivo G1

वीवो जी1 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन को 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल आणि हि एमोलेड स्क्रीन असेल. Vivo G1 मध्ये एंडरॉयडचा लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 दिला जाईल तसेच हा फोन 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल. लीकनुसार वीवो आपला हा फोन सॅमसंगच्या एक्सनॉस 980 चिपसेट सह बाजारात येऊ शकतो.

Vivo G1 मध्ये क्चॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची टेलीफोटों लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Vivo G1 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे.

Vivo G1 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करेल. लीकनुसार या फोनची किंमत 3000 युआन असू शकते. हि किंमत इंडियन करंसीनुसार 32,500 रुपयांच्या आसपास आहे. समोर आलेल्या फोनच्या स्पेसिफिकेशन्स वर तोवर विश्वास ठेवता येणार नाही जोवर स्वतः वीवो या फोनच्या संबंधित घोषणा करत नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here