फक्त 5,599 रुपयांमध्ये लॉन्च झाला फेस अनलॉक फीचर वाला 4जी स्मार्टफोन कोमियो सी1 प्रो

टेक कंपनी कोमियो ने मागच्या महिन्यातच भारतीय बाजारात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन एक्स1 नोट लॉन्च केला होता. 6-इंचाचा बेजल लेस डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन फक्त 9,999 रुपयांमध्ये आला होता बाजारात, जो खुप लोकांना आवडला होता. तसेच पुन्हा एकदा स्वस्त बजेट मध्ये शानदार स्मार्टफोन घेऊन येत कोमियो ने अजून एक नवीन डिवाईस सादर केला आहे. कोमियो ने सी1 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो फक्त 5,599 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

कोमियो सी1 प्रो मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या सी1 चा नेक्स्ट वर्जन आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5-इंचाच्या एचडी आईपीएस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे तसेच 64बिट क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6739 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 1.5जीबी रॅम देण्यात आला आहे. फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

कोमियो सी1 प्रो रियल डुअल सिम फोन आहे तसेच फोनच्या दोन्ही सिम स्लॉट वर 4जी नेटवर्क एक्सेस करता येते. वोएलटीई सह हा स्मार्टफोन वीएलटीई ची सुविधा पण देतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 2,500एमएएच ची बॅटरी आहे. कोमियो सी1 प्रो 5,599 रुपयांमध्ये मेटालिक ग्रे, सनराईज गोल्ड आणि रॉयल ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

कोमियो सी1 प्रो आॅनलाईन प्लॅटफार्म सोबत आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल. विशेष म्हणजे जियो कस्टमर्स कोमियो सी1 प्रो 2,200 रुपयांच्या डिस्काउंट आॅफर वर घेऊ शकतात. त्यामुळे जियो यूजर्स साठी या फोनची इफेक्टिव ​किंमत फक्त 3,399 रुपये होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here