भारतीय कंपनी Karbonn लॉन्च करेल 2 नवीन स्मार्टफोन, बनवत आहे संपूर्ण स्वदेशी सॉफ्टवेयर

Boycott China गेल्या काही दिवसांपासून भारतात ट्रेंड करत आहे. भारतीय नागरिक चिनी वस्तू तसेच चीनी कंपन्यांचा बहिष्कार करत आहेत आणि भारतीय ब्रँड्स वापरण्याचा सल्ला देत आहेत. टेक विश्व आणि स्मार्टफोन मार्केट पण यातून वाचला नाही. चीनी मोबाईल ब्रँड्सना यूजर्स टाळत आहे आणि भारतीय कंपन्या तसेच आपल्या देशातील प्रोडक्ट्स निवडण्याची मोहीम सुरु झाली आहे. यात इंडियन टेक ब्रँड Karbonn Mobiles ने मोठी घोषणा करून सांगितले आहे कि ते लवकरच दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत.

कॉर्बन मोबाईल्सचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर शशीन देवसारे यांनी टेक वेबसाइट द मोबाईल इंडियन सह झालेल्या मुलाखतीत असे सांगितले कि कंपनी लवकरच भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. कंपनीच्या अधिकार्यांद्वारे या दोन्ही स्मार्टफोन्सच्या नावाची माहिती मिळाली नाही, पण असे स्पष्ट झाले आहे कि हे दोन्ही मोबाईल लो बजेट मध्ये सादर केले जातील.

स्मार्टफोन सोबतच इतर प्रोडक्ट पण होतील लॉन्च

Karbonn Mobiles द्वारे सांगण्यात आले आहे कि हे दोन्ही स्मार्टफोन ऑगस्ट मध्ये बाजारात येतील तसेच यांची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. स्मार्टफोन्सच्या माहिती सोबतच शशीन यांनी सांगितले कि कॉर्बन मोबाईल्स आपल्या सॉफ्टवेयर आणि यूजर इंटरफेस वर काम करत आहे आणि हा पूर्णपणे भारतीय ग्राहकांचा विचार करून बनवण्यात येत आहे. कॉर्बन मोबाईल्सचा नवीन सॉफ्टवेयर पूर्णपणे भारतीय असेल.

कॉर्बन मोबाईल्सचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर शशीन यांच्या मते स्मार्टफोन्स व्यतिरिक्त कंपनी इतर अनेक ‘मेड इन इंडिया’ प्रोडक्ट्स वर पण काम करत आहे. हे डिवाईस वेगवेगळे असतील आणि यात काही असे प्रोडक्टस पण असतील जे आज पर्यंत कोणत्याही टेक कंपनी या ब्रँडने भारतात लॉन्च केले नाहीत. शशीन यांनी कॉर्बनचा स्मार्टवॉच लॉन्च होणार असल्याचा खुलासा पण केला आहे.

होणार नाही डेटा चोरी

कंपनीच्या यूजर इंटरफेस व सॉफ्टवेयर बाबत शशीन म्हणाले कि हा सॉफ्टवेयर पूर्णपणे भारतीय असेल जो भारतीय यूजर्सच्या सुरक्षेसाठी बनवण्यात येईल. या नवीन सॉफ्टवेयर मध्ये यूजर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील जो देशाबाहेर कुठेही लीक होऊ शकणार नाही. शशीन यांनी दावा केला आहे कि या यूआई मध्ये डेटा लीकेजसाठी एक्स्ट्रा लेयरचा वापर केला गेला आहे. कंपनीच्या यूआई मध्ये कोणतीही जाहिरात नसेल.

भारतीय ब्रँड Karbonn Mobiles चे एग्जीक्यूटिव डायरेक्टर शशीन देवसारे म्हणाले आहेत कि, कंपनीचा वेग नक्कीच मंदावला आहे पण याचा अर्थ असा नाही कि आम्ही शांत बसलो आहोत.सध्या आम्ही यशस्वी नाही पण लवकरच भारत आणि भारतीय कंपनी वेगाने वर येतील.’

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here