अलीकडेच बातमी आली आहे कि चीनी कंपनी Xiaomi येत्या 27 एप्रिलला अंर्तराष्ट्रीय टेक बाजारात ‘मी 10 सीरीज’ चा नवीन फोन लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहे कि हा फोन Mi 10 Youth नावाने एंट्री घेईल. आशा आहे कि मी 10 यूथ च्या इंटरनेशनल लॉन्च नंतर लवकरच शाओमी भारतात पण आपल्या या सीरीजचा विस्तार करत Mi 10 आणि M10 Pro लॉन्च करेल. आज इंटरनेट वर Mi 10 Youth च्या लॉन्चच्या आधीच याच्या कॅमेऱ्याची माहिती पण लीक झाली आहे. या फोन सोबतच शाओमी आपल्या यूजर इंटरफेसचा नवीन वर्जन MIUI 12 पण टेक वर्ल्ड समोर सादर करेल.
Xiaomi द्वारे Mi 10 Youth चा प्रोमोशनल पोस्टर आणि एक प्रोमो वीडियो शेयर केला गेला आहे. या वीडियो मध्ये एकीकडे फोन द्वारे क्लिक केले गेलेले काही कॅमेरा सॅंपल्स शेयर केले गेले आहेत तसेच फोनची कॅमेरा प्लेसमेंट आणि लेंसची माहिती पण दिसत आहे. पोस्टर वरून समजले आहे कि फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल जो वर डावीकडे असेल. हा कॅमेरा सेटअप चौकोनी आकाराचा असेल ज्यात वर दोन सेंसर, त्याखाली दोन सेंसर आणि खाली फ्लॅश लाईट आणि बाजूला लेंसची माहिती आहे.
फोटो समोर आल्यामुळे समजले आहे कि Mi 10 Youth क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात एक पेरिस्कोप लेंस पण असेल. फोनचा रियर कॅमेरा AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येईल. प्रोमोशनल पोस्टर मध्ये लिहिण्यात आले आहे कि मी 10 यूथ च्या कॅमेरा सेटअप मध्ये ‘हाई डे फेनेशन’ प्राइमरी सेंसर असेल. त्याचबरोबर एक वाइड अँगल लेंस, एक मॅक्रो लेंस आणि एक 50x सुपरजूम क्षमता असलेली पेरिस्कोप लेंस दिली जाईल.
आशा आहे कि Mi 10 Youth शाओमी द्वारे आधी लॉन्च केल्या गेलेल्या Mi 10 Lite 5G चा रिब्रँडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे. जर हा फोन दुसरा वर्जन असेल तर सांगू इच्छितो कि मी 10 लाइट मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर, 5 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर आणि 2 मेगापिक्सलची चौथी लेंस मी 10 लाइट मध्ये आहे.
Mi 10 Lite
शाओमी मी 10 लाइट पाहता यात 6.57-इंचाचा एमोलेड ट्रू-कलर डिस्प्ले देण्यात आला आहे जो वाटरड्रॉप नॉच सह येतो. हा फोन पण इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल. फोन मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765G चिपसेट देण्यात आला आहे जो Mi 10 Lite ला 5G इनेबल्ड बनवतो. एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 2.1 स्टोरेज टेक्नॉलॉजी सह येतो.
फोटोग्राफीसाठी Xiaomi Mi 10 Lite वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. शाओमी मी 10 लाइट 5जी मध्ये पावर बॅकअपसाठी 4,160 एमएएच क्षमता असलेली बॅटरी दिली आहे, जी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच स्मार्टफोन क्विक चार्ज 3.5 ला पण सपोर्ट करतो. शाओमी Mi 10 Youth च्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी आता 27 एप्रिलची वाट बघितली जात आहे.















