भारतीय टेलिकॉम ऑपरेटर्स अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या किंमतीत नवीन प्रीपेड प्लान्स देत आहेत. या प्रीपेड प्लानच्या मदतीने कंपन्यांचा प्रयत्न ग्राहकांना आपल्या नेटवर्क मध्ये जोडण्याचा आहे. यामुळे ग्राहकांसमोर पर्याय उपलब्ध झाले आहेत, ज्यामुळे ते आपल्या आवश्यकतेनुसार प्लान निवडू शकतात. आज आम्ही तुम्हाला एयरटेलच्या त्या तीन प्लान्सची माहिती देणार आहोत जे 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात. या प्लान्सची खासियत अशी आहे कि या प्लान्सच्या उपलब्धतेचे सर्कल्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हे प्लान्स भारतातील इतर अनेक सर्कल्स मध्ये उपलब्ध होतील. हे प्रीपेड रिचार्ज प्लान्स 99 रुपये, 129 रुपये आणि 199 रुपयांचे आहेत.
विशेष म्हणजे हे तिन्ही प्लान्स आधी निवडक सर्कल्स मधेच उपलब्ध होते. पण आता त्या सर्कल्स सोबतच हा दुसऱ्या राज्यांत रिचार्जसाठी उपलब्ध होतील. एयरटेलचा 99 रुपयांचा प्लान आता बिहार, झारखंड आणि ओरिसा मध्ये पण उपलब्ध होईल. याआधी हा प्लान कोलकाता, वेस्ट बंगाल, राजस्थान, यूपी, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये उपलब्ध होता.
तसेच कंपनी अपने 129 रुपये आणि 199 रुपयांचे प्लान दिल्ली-एनसीआर, आसाम, बिहार, झारखंड, मुंबई, नॉर्थ ईस्ट आणि ओडिशा मध्ये उपलब्ध करेल. Only Tech ने आपल्या एका रिपोर्ट मध्ये हि माहिती दिली आहे.
एयरटेलचा 99 रुपयांचा प्लान
एयरटेलचा 99 रुपयांचा प्लान पाहता यात 24 दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच रिचार्ज मध्ये 1GB डेटा सह अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचा लाभ मिळेल. यूजर्स या फ्री कॉलिंगचा फायदा कोणत्याही नेटवर्क वर कॉल करण्यासाठी घेऊ शकतात. तसेच प्लान मध्ये रोज 100 SMS सह एयरटेल एक्सट्रिम, विंक म्यूजिक आणि झी5 प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
एयरटेलचा 129 रुपयांचा प्लान
एयरटेलच्या 129 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर यात 24 दिवसांच्या वैधतेसह यूजरला 300 SMS मिळेल. तसेच यूजर यात 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सारखे फायदे मिळतील . तसेच यूजर्सना फ्री मध्ये एयरटेल एक्सट्रिम, विंक म्यूजिक आणि झी5 प्रीमियमचे सब्सक्रिप्शन मिळेल.
एयरटेलचा 199 रुपयांचा प्लान
एयरटेल आपल्या 199 रुपयांच्या प्लान मध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह रोज 1GB डेटा मिळेल. सोबतच यूजर्सना फ्री कॉलिंग आणि रोज 100 SMS दिले जात आहेत. या प्लान मध्ये पण एयरटेल एक्सट्रिम, विंक म्यूजिक आणि झी5 प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.














