Realme ने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने Realme C11 भारतीय मार्केट मध्ये आणला आहे. हा डिवाईस लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत फक्त 7,499 रुपये आहे. मोठी बॅटरी व आर्कषक लुक असलेला रियलमी सी11 येत्या 22 जुलै पासून कंपनीच्या वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.
लुक व डिजाईन
Realme C11 च्या लुक व डिजाईन बद्दल बोलायचे तर हा फोन हा फोन चौकोनी डिजाइन कॅमेरा सेटअप सह आला आहे. फोनच्या मागे चौकोनी डिजाइन कॅमेरा सेटअप आहे, ज्यात दोन रियर कॅमेरे आणि फ्लॅश लाइट आहे. तसेच या कॅमेरा सेटअपच्या खाली कंपनीची ब्रांडिंग आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर मिनी-ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. रियलमी सी11 च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर व पावर बटन देण्यात आला आहे तसेच खालच्या पॅनल वर स्पीकर ग्रिल आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.
फीचर्स व स्पेसिफिकेशन्स
Realme C11 कंपनीने 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88.7 टक्के आहे. हा स्मार्टफोन 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. रियलमी सी11 एंडरॉयड 10 आधारित फोन आहे जो रियलमी यूआई सह चालतो.
प्रोसेसिंगसाठी रियलमी सी11 मध्ये 2.3गीगाहर्ट्ज स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन IMG PowerVR GE8320 जीपीयू ला सपोर्ट करतो. भारतीय बाजारात Realme C11 2 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme C11 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या पोर्टरेट लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी रियलमी सी11 मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Realme C11 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी रियलमी सी11 मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय बाजारात हा फोन Rich Green आणि Rich Gray कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 22 जुलै पासून 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
















