लाँचपूर्वी OnePlus 11 स्मार्टफोन टेना वर झाला लिस्ट; सर्व स्पेसिफिकेशन्स समजले

अँड्रॉइड स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसनं अलीकडेच इंडस्ट्रीमध्ये नऊ वर्ष पूर्ण केली आहेत. आता कंपनी दहाव्या वर्षाची सुरुवात दणक्यात करणार असं दिसतंय. OnePlus 11 5G 7 फेब्रुवारीला दिल्लीत होणाऱ्या एका इव्हेंटच्या माध्यमातून भारतात लाँच होईल. हा एका हायएन्ड स्पेसिफिकेशन्स असलेला फ्लॅगशिप फोन असेल. परंतु आता बाजारात पाऊल टाकण्याआधीच हा वनप्लस स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट झाला आहे जिथे वनप्लस 11 5जी फोनचे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

OnePlus 11 5G specifications

  • 6.7″ QHD+ AMOLED डिस्प्ले
  • 16GB RAM आणि 512GB स्टोरेज
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 16MP सेल्फी कॅमेरा
  • 50MP + 48MP + 32MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 100W फास्ट चार्जिंग

सर्टिफिकेशन्स साइट टेना नुसार वनप्लस 11 5जी फोन 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या क्वॉडएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. हा अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेला असेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार ही फोन स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो तसेच यात 10बिट कलर आउटपुट मिळू शकतो. सर्टिफिकेशनमध्ये फोनचे डायमेंशन 163.1 x 74.1 x 8.53एमएम आणि वजन 205ग्राम असे लिस्ट करण्यात आले आहेत. या फोनमध्ये अलर्ट स्लाईडर देखील दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: New OTT releases this week: बहुचर्चित ‘थँक गॉड’ आणि पिचर्स येतायत ओटीटीवर, पाहा संपूर्ण यादी

OnePlus 11 5G फोन टेनानुसार अँड्रॉइड 13 वर लाँच केला जाऊ शकतो जो कलरओएस 13 वर चालू शकतो. अन्य लीक्समध्ये या फोनमध्ये ऑक्सीजनओएस असल्याचं सांगण्यात आलं आहे. टेना नुसार हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच होऊ शकतो. सर्टिफिकेशनमधून या फोनचे 12जीबी रॅम आणि 16जीबी रॅम व्हेरिएंट समोर आले आहेत ज्यात 256 जीबी स्टोरेज आणि 512जीबी स्टोरेज मिळू शकते.

वनप्लस 11 5जी फोन Hasselblad लेन्ससह बाजारात येईल, असं कंपनीनं सांगितलं आहे. टेना सर्टिफिकेशन नुसार स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 2एक्स ऑप्टिकल झूम असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या सेटअपमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 48 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर OnePlus 11 5G 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: वनप्लस सारखे फीचर्स स्वस्तात देणाऱ्या स्मार्टफोनची लाँच डेट समजली; तीन मॉडेल होणार लाँच

फोनच्या बॅक कॅमेरा सेटअपमधील या लेन्स 50MP Sony IMX890 सेन्सर, 48MP IMX581 सेन्सर आणि 32MP IMX709 सेन्सर असू शकतात, अशी माहिती आधी आली होती. टेना सर्टिफिकेशन पाहता हा वनप्लस 11 5जी फोन 5,000एमएएच ड्युअल-सेल बॅटरीसह येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे ज्यात सिंगल-सेल व्हॅल्यू 2,435एमएएच असू शकते. तसेच लिस्टिंगमध्ये OnePlus 11 5G स्मार्टफोन 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल, असं सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here