कोरोना वायरस जगासोबतच भारतात आपले पाय पसरत आहे. भारत कोरोना संक्रमित देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आला आहे आणि कोरोना संक्रमणाची संख्या 11 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. कोरोना काळात सर्व व्यवसायांना खूप नुकसान झाले आहे, ज्यातून स्मार्टफोन इंडस्ट्री पण वाचली नाही. लॉकडाउनमुळे स्मार्टफोनची विक्री आधीपेक्षा खूप कमी झाली आहे. रिसर्च फर्म कॅनलिसच्या रिपोर्ट मध्ये याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार स्मार्टफोन शिपमेंट मध्ये 48 टक्के घसरण झाली आहे. पण यातही शाओमीने सर्वात जास्त फोन्सची विक्री भारतीय बाजारात केली आहे.
रिसर्च फर्म Canalys नुसार, प्रोडक्शन कमी झाल्यामुळे आणि आयातीत झालेल्या उशिरामुळे 2020 च्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय स्मार्टफोन शिपमेंट मध्ये 48 टक्के घसरण झाली आहे. Q2 2019 मध्ये 33 मिलियनच्या तुलनेत यावर्षी Q2 मध्ये भारतात एकूण 17.3 मिलियन (1.73 कोटी) स्मार्टफोन विकले गेले. कॅनलिसच्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हि घसरण कमी झालेल्या मागणीमुळे आहे.
शाओमीने विकले सर्वात जास्त फोन
Xiaomi (सब-ब्रँड पोको सहित) ने सर्वात जास्त फोन 5.3 मिलियन विकले, जो बाजाराचा 30.9 टक्के हिस्सा होता. तर Vivo ने 3.7 मिलियन यूनिट विक्री केले. विशेष म्हणजे वीवोची बाजारातील हिस्सेदारी यावर्षी Q2 2019 मधील 17.5 टक्क्यांवरून 21.3 टक्के झाली आहे. Samsung ने 2.9 मिलियन स्मार्टफोन विकले, 16.8 टक्के मार्केट शेयर सह तिसरे स्थान मिळवले आहे.
ओप्पोने 12.9 टक्के हिस्सेदारी सह 2.2 मिलियन यूनिट स्मार्टफोन्सची विक्री केली, तर Realme ने 1.7 स्मार्टफोन्स विकले आणि 10 टक्के हिस्सेदारी वर कब्जा केला. इतर स्मार्टफोन निर्मात्यांनी 1.4 मिलियन यूनिट विक्री केले जे उर्वरित 8.1 टक्के मध्ये येतात.
ग्राहकांनी का विकत घेतले नाहीत फोन्स
रिसर्च कंपनीनुसार कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम तर झाला आहे पण यामुळे स्मार्टफोन बाबत लोकांच्या व्यवहारात पण खूप बदल झाला आहे. ग्राहकांनी स्मार्टफोन विकत घेणे टाळले आहे, ज्यामुळे इंडस्ट्री वर वाईट परिणाम झाला आहे.
चीन मधून मागवले होते फोन
पहिल्या तिमाहीत उत्पादन कमी झाल्यामुळे अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी बाहेरून फोन मागवले होते. कॅनलिसच्या विशेषज्ञ मधुमिता चौधरी यांच्या मते भारतात अजूनही स्मार्टफोन बाजारसाठी रस्ता कठीण आहे. पण अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यापासून ऑनलाइन प्लॅटफॉर्मने ग्रीन आणि ऑरेंज जोन मध्ये स्मार्टफोनची डिलीवरी सुरु केली आहे.















