Jio vs Airtel vs Vodafone: जाणून घ्या 149 रुपयांमध्ये कोणाच्या प्लान मध्ये आहे जास्त दम

भारतात गेले अनेक दिवस टेलीकॉम कंपन्यांमध्ये कमी किंमतीतील प्रीपेड सेवांच्या बाबतीत स्पर्धा सुरु आहे. या शर्यतीत टेलीकॉम कंपन्यांचा प्रयत्न कमी किंमतच्या प्लान मध्ये यूजर्सना जास्तीत जास्त लाभ देण्याचा आहे, जेणेकरून ग्राहकांनी दुसऱ्या कंपनीकडे वळू नये. या शर्यतीत जियो, एयरटेल आणि वोडाफोन आइडिया यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्यांकडे अनेक स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत, ज्यात ग्राहकांना शानदार फायदे दिले जात आहेत. पण आज आम्ही तिन्ही कंपनीच्या 149 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जची तुलना करणार आहोत. इथे आम्ही जियो, वोडाफोन आणि एयरटेल मधील कोणती कंपनी 149 रुपयांमध्ये जास्त सुविधा देते हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Reliance Jio

जियोच्या 149 रुपयांच्या प्लान पद्दल बोलायचे तर या रिचार्ज मध्ये यूजर्सना रोज 1GB डेटा दिला जात आहे. या प्लानची वैधता 24 दिवस आहे. म्हणजे जियो ग्राहकांना एकूण 24जीबी डेटा मिळेल. या प्लान मध्ये जियो-टू-जियो कॉलिंग फ्री आहे. तर दुसऱ्या नेटवर्कच्या नंबर वर कॉल करण्यासाठी 300 मिनिट्स मिळतात. प्लान मध्ये रोज 100 SMS फ्री मिळतील. तसेच जियो ऍप्सचे कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते.

Airtel

150 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या एयरटेलच्या प्लान बद्दल बोलायचे तर हा 149 रुपयांचा आहे. या प्लान मध्ये यूजर्सना कोणत्याही नंबर वर अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळते. सोबत रिचार्ज मध्ये यूजर्सना 2GB डेटा दिला जात आहे. या प्लानची वैधता 28 दिवस आहे. प्लान मध्ये यूजर्सना 300 SMS पाठवण्याची सुविधा पण मिळते. तसेच एयरटेल एक्सट्रीम ऍपचे सब्सक्रिप्शन पण मिळते.

Vodafone idea

Vodafone idea च्या 149 रुपयांच्या प्लान मध्ये रोज 2GB डेटा दिला जात आहे. डेटा सोबत यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ पण मिळेल. या प्लानची वैधता 28 दिवस आहे. याव्यतिरिक्त यूजर्सना वोडाफोन प्ले चे सब्सक्रिप्शन पण अगदी मोफत मिळेल.

एयरटेल आणि वोडाफोनच्या रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्क वर फ्री कॉल करण्यासोबत डेटाचा फायदा मिळत आहे. तर रिलायंस जियोच्या प्लान मध्ये डेटा सह जियो-टू-जियो फ्री कॉलिंग आणि दुसऱ्या नेटवर्कच्या नंबर वर कॉल करण्यासाठी काही नॉन जियो मिनिट्स दिले जात आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here