Honda Activa Electric लाँच बद्दल खुद्द CEO नी केला खुलासा; लवकरच येणार इलेक्ट्रिक स्कूटर

Highlights

  • Honda Activa EV साल 2024 मार्चमध्ये लाँच केली जाईल.
  • कंपनीचे सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी कंपनीच्या ईव्ही रोडमॅपचा खुलासा केला.
  • Honda Activa EV चा टॉप स्पीड ताशी 50 किमी असू शकतो.

Honda Activa Electric Scooter ची वाट पाहत असलेल्या ग्राहकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. Honda Activa चे पेट्रोल व्हर्जन लाँच करताना अलीकडेच कंपनीच्या CEO नी Honda Activa EV Launch बद्दल मोठा खुलासा केला आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआई) चे एमडी आणि सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी कंपनीच्या ईव्ही रोडमॅपची माहिती दिली आहे. त्यानुसार, अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक पुढील वर्षी मार्च 2024 मध्ये लाँच होऊ शकते. अचूक लाँच डेटची माहिती समोर आली नाही. परंतु एवढ्या माहितीमुळे अ‍ॅक्टिव्हाच्या बॅटरी अवतारची वाट पाहत असलेले ग्राहक नक्कीच खुश होतील.

इतका असेल टॉप स्पीड

भारतात होंडाची पहिली EV कंपनीच्या बेस्टसेलिंग अ‍ॅक्टिव्हा स्कूटरचं इलेक्ट्रिक व्हर्जन असेल, असा अंदाज आधीपासून लावला जात आहे. आता यावर कंपनीच्या सीईओनी स्वतःहून शिकामोर्तब केला आहे. त्यामुळे आता अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक आपल्या आयसीई-बेस्ड व्हर्जन प्रमाणेच लोकप्रिय होते की नाही ते येणारा काळच सांगेल. तसेच ओगाटा यांनी खुलासा केला आहे यात एक फिक्स्ड बॅटरी सेटअप असेल आणि मॅक्स ताशी 50 किमीचा स्पीड मिळेल. हे देखील वाचा: Mahindra ची TATA ला भीती! XUV400 EV लाँच होताच कमी केली Nexon Electric ची किंमत, रेंजही वाढवली

रिपोर्ट्स नुसार कंपनी अ‍ॅक्टिव्हा ईव्हीनंतर आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर सादर करेल जी पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. हा दुसरा मॉडेल स्वॅपेबल बॅटरी सेटअपसह सादर केला जाईल आणि बाजारात उपलब्ध अन्य इलेक्ट्रिक स्कुटर्सपेक्षा बेस्ट परफॉर्मन्स देईल. ओगाटा यांनी म्हटलं आहे की, “गेल्या काही वर्षांपासून, कंपनीसाठी व्यावसायिक दृष्ट्या ईव्ही सेगमेंटमध्ये गुंतवणूक करणे महत्वाचे नव्हते. परंतु बाजाराची अपेक्षा वाढल्यामुळे आम्ही पुढील वर्षी ईव्ही सेगमेंटमध्ये येत आहोत.”

इतकेच नव्हे तर ओगाटा यांनी म्हटलं की, “कमी अंतरावरील प्रवासासाठी ग्राहक भविष्यात अ‍ॅक्टिव्हा ईव्हीची निवड करतील. परंतु दूरवरच्या प्रवासासाठी आयसीई अ‍ॅक्टिव्हाच खरेदी करतील.” हे देखील वाचा: कमी स्पीड असून देखील तुटलं OLA S1 PRO चं फ्रंट सस्पेंशन; महिला चालक ICU मध्ये भरती

तसेच ओगाटा यांनी सांगितलं की एचएमएसआय चीनमधून होंडाचं कोणतंही ईव्ही प्रोडक्ट आधी भारतीय बाजारात येऊ शकतं. गेल्या सहा महिन्यात, कंपनी ई-मोटरसह बॅटरी स्थानिक स्थरावर बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, आणि आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये यातील गुंतवणुकीचा मोठा भाग आपल्या निर्मितीच्या फ्रेमवर्क आयसीई दोनच्या उत्पादनसाठी राखीव असेल. तसेच अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक मध्ये फिक्स्ड बॅटरी सेटअप दिला जाऊ शकतो. अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिकची रेंज नॉर्मल असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here