सॅमसंगने स्पेशल एडिशन स्मार्टफोन Galaxy M31 Prime भारतात लॉन्च केला आहे. अनेक दिवसांपासुन फोन कंपनी द्वारे टीज केला जात होता. हा स्पेक्स आणि डिजाइनच्या बाबतीत अगदी गॅलेक्सी एम31 सारखा आहे. कंपनीनुसार फेस्टिव सीजन लक्षात ठेऊन फोन अमेझॉन सह मिळू तयार केला गेला आहे. याची विक्री अमेझॉन वर 17 ऑक्टोबरला होईल, प्राइम यूजर्स 16 ऑक्टोबर पासून हा विकत घेऊ शकतात.
अमेझॉन प्राइम मेंबरशिप मिळेल मोफत
प्राइम एडिशन फोन सह अमेझॉन प्राइम मेंबरशिप पण 3 महिन्यासाठी मोफत दिली जात आहे. अमेझॉन वर बनलेल्या पेज वरून याचा खुलासा आधीच झाला होता. वर सांगितल्याप्रमाणे सॅमसंग गॅलेक्सी एम31 प्राइम एडिशनची विक्री अमेझॉन इंडिया वर 17 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या ग्रेट इंडियन सेल मध्ये होईल. तर प्राइम यूजर्सना सेलचा अर्ली ऍक्सेस 16 ऑक्टोबर पासून मिळेल.

किंमत
सॅमसंगने ऑफिशियली माहिती दिली आहे कि गॅलेक्सी एम31 प्राइम एडिशनची किंमत 16,499 रुपयांपासून सुरु होईल. हि किंमत डिवाइसच्या 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज वेरियंटची असेल. तसेच फोनचा Space Black, Ocean Blue आणि Iceberg Blue कलर मध्ये सादर केला गेला आहे.
बॅटरी
Samsung Galaxy M31 Prime एडिशन भारतीय बाजारात 6,000 एमएएच च्या मोठ्या आणि पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे, जी 15वॉट फास्ट चार्जिंग फीचरला पण सपोर्ट करेल. कंपनीच्या दाव्यानुसार हा फोन 48 तास टॉक टाईम आणि 26 तास वीडियो प्लेबॅक देऊ शकेल. विशेष म्हणजे गॅलेक्सी एम31 प्राइमच्या रिटेल बॉक्स मध्ये यूएसबी टाईप सी असलेला 15वॉटचा चार्जर पण असेल.
कॅमेरा
Samsung Galaxy M31 Prime Edition मध्ये क्वाड रियर कॅमेरा असेल, ज्याचा प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असेल. या सेंसरची अर्पचर क्षमता एफ/1.8 सांगण्यात आली आहे. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेंस, एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा असल्याचे समोर आले आहे. Samsung Galaxy M31 च्या रियर कॅमेरा सेटअप पण याच सेंसर्स सह येतो. म्हणजे इथे पण हे दोन्ही फोन एक समान आहेत.
स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M31 Prime Editon चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन इनफिनिटी ‘यू’ डिस्प्लेला सपोर्ट करतो तसेच या स्मार्टफोन मध्ये 6.4 इंचाची फुलएचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. सॅमसंगने गॅलेक्सी एम31 प्राईम एडिशन अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला आहे त्याचबरोबर फोन मध्ये 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे.















