15 डिसेंबरला भारतात एंट्री करेल Xiaomi चा 6,000एमएएच बॅटरी असलेला पावरफुल स्मार्टफोन Redmi 9 Power

Xiaomi ने काही दिवसांपूर्वी आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये ‘रेडमी नोट 9’ सीरीजचा विस्तार केला आहे. या सीरीज अंतगर्त Redmi Note 9 Pro, Redmi Note 9 5G तसेच Redmi Note 9 4G स्मार्टफोन लॉन्च केले गेले होते. टेक विश्वात चर्चा आहे कि चीन मध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट 9 4जी मॉडेल भारतात पण लॉन्च होईल आणि देशात Redmi 9 Power नावाने एंट्री घेईल. तसेच आता बातमी येत आहे कि रेडमी 9 पावर नाव असलेला हा स्मार्टफोन येत्या 15 डिसेंबरला भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो.

Redmi 9 Power च्या इंडिया लॉन्चची माहिती टिपस्टर मुकुल शर्माच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरने दावा केला आहे कि शाओमी कंपनी येत्या 15 डिसेंबरला भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल जो Redmi 9 Power नावाने मार्केट मध्ये एंट्री करेल. Xiaomi ने आतापर्यंत आपल्या नवीन प्रोडक्ट लॉन्चची कोणतीही माहिती दिली नाही पण आशा आहे कि येत्या काही दिवसांत कंपनी लवकरच एखादी ऑफिशियल घोषणा करेल आणि फोनच्या लॉन्च डेटची माहिती देईल.

Redmi 9 Power

रेडमी 9 पावर स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता चीन मध्ये हा स्मार्टफोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे जो कोर्निग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित मीयुआय 12 वर सादर केला गेला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर चालतो.

शाओमी रेडमी 9 पावर बद्दल बोलले जात आहे कि भारतीय बाजारात हा फोन दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. विशेष म्हणजे चायना मध्ये हा फोन 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लॉन्च झाला होता.

हे देखील वाचा : जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi 9 Power ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्यासोबतच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शाओमी रेडमी 9 पावर स्मार्टफोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiaomi Redmi 9 Power डुअल सिम फोन आहे ज्यात सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चर्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएचच्या मोठी बॅटरीला सपोर्ट करतो. लीकनुसार भारतात हा फोन Black, Blue आणि Green कलर मध्ये लॉन्च होईल. 15 डिसेंबरच्या लॉन्च डेटसाठी शाओमीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here