नवीन वर्षात धमाका करण्यास येत आहे Samsung Galaxy A72 5G, अशी असेल डिजाइन

Samsung आपल्या प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन पोर्टफोलियो वाढवत नवीन फोन Galaxy A72 5G सादर करण्याची प्लानिंग करत आहे. हा फोन कंपनीच्या लोकप्रिय Galaxy A71 चा अपग्रेडेड वर्जन असेल जो यावर्षी सादर केला गेला होता. अधिकृतपणे गॅलेक्सी ए72 5G बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. आता Samsung Galaxy A72 5G चे रेंडर्स समोर आले आहेत जे OnLeaks फेम Steve Hemmerstoffer ने जारी केले आहेत. या रेंडर्स वरून अपकमिंग हँडसेटच्या फुल डिजाइनची माहिती समोर आली आहे. दिसायला हा फोन काहीसा Galaxy A52 5G सारखा दिसत आहे.

रेंडर्स नुसार Samsung Galaxy A72 5G मध्ये मध्यभागी पंच-होल कटआउट असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा असेल. फोन मध्ये फ्लॅट स्क्रीन स्लिम बेजल सह येईल. तसेच फोन मध्ये बॅक पॅनल वर आयताकृती कॅमेरा मॉड्यूल चार सेंसर आणि एक एलईडी फ्लॅश आहे जो सॅमसंगच्या ब्रँडिंग सह येईल. फोन मध्ये वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजवीकडे आहेत. डिवाइस मध्ये 3.5mm ऑडियो जॅक, स्पीकर ग्रिल, माइक्रोफोन आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट बॉटमला आहेत. तसेच फोनच्या टॉपला सिम ट्रेची जागा देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A72 5G च्या मागे पॅटर्न डिजाइन आणि ग्लास बॅक (ग्लास्टिक) आहे. हँडसेटच्या मागे फिंगरप्रिंट सेंसरसाठी कोणतीही जागा नाही, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल.

हे देखील वाचा : Vivo Y31 सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, भारतात करू शकतो एंट्री

सॅमसंग गॅलेक्सी A72 5G बाबत सध्या जास्त माहिती समोर आली नाही. समोर आलेल्या काही रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 7xx सीरीज चिपसेट सह शिप केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये अँड्रॉइड 11 वन युआय कस्टम स्किन आणि एमओएलईडी डिस्प्ले हाई रिफ्रेश रेट सह मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी A72 5G चा लॉन्च 2021 च्या पहिल्या सहामाहीत होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here