Nokia ने या महिन्यात Nokia C1 Plus आणि Nokia 5.3 सारखे स्मार्टफोन टेक मंचावर सादर केले आहेत तर भारतीय बाजारात पण आपला लो बजेट स्मार्टफोन Nokia 2.4 विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. यावर्षी कोरोना वायरसमुळे नोकिया ब्रँडचे बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Nokia 9.3 PureView आणि Nokia 8.3 लाॅन्च होऊ शकले नाहीत पण असे वाटते कि साल 2021 साठी नोकियाने चांगली तयारी केली आहे. नवीन वर्ष सुरु होण्याआधीच नोकियाचे दोन नवीन स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट झाले आहेत.
नोकियाचे दोन स्मार्टफोन दरअसल सर्टिफिकेशन्स साइट TUV Rheinland वर स्पाॅट केले गेले आहेत. इथे एक फोनचा मॉडेल नंबर CN110 सांगण्यात आला आहे तर दुसरा नोकिया फोन WT340 मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. लिस्टिंग मध्ये दोन्ही स्मार्टफोन्सच्या बॅटरी कपॅसिटीचा खुलासा केला गेला आहे. सर्टिफिकेशन्स नुसार CN110 मॉडेल नंबर असलेल्या स्मार्टफोन मध्ये 4,500एमएएचची बॅटरी मिळेल तसेच WT340 मॉडेल नंबर असलेला स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरी सह लाॅन्च केला जाईल. लिस्टिंग नुसार हे दोन्ही नोकिया स्मार्टफोन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतील.
Nokia 5.4
Nokia 5.4 कंपनीने 6.39 इंचाच्या आयपीएस एलसीडी पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो एचडीप्लस रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. एचएमडी ग्लोबलने आपला हा नवीन स्मार्टफोन अँड्रॉइड 10 च्या स्टॉक वर्जन वर लॉन्च केला आहे जो लवकरच अँड्रॉइड 11 ओएस वर अपडेट होईल. प्रोसेसिंगसाठी नोकिया 5.4 मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे.
एचएमडी ग्लोबलने आंतरराष्ट्रीय बाजारात आपला फोन तीन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे ज्याचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज तसेच तिसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 5.4 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्यासोबत 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा : JioPhone नंतर अंबानींचा नवीन डाव, येत आहे अजून एक 4G फीचर फोन, किंमत असेल 1,000 पेक्षा कमी
Nokia 5.4 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी नोकिया 5.4 मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
नोकिया 2.4 व्हिडीओ















