1 फेब्रुवारीला येणाऱ्या Samsung Galaxy S23 सीरीज उपलब्ध असलेली ‘ए टू झेड’ माहिती जाणून घ्या इथे

Samsung galaxy S22 Ultra
Highlights

  • Samsung Galaxy S23 series 1 फेब्रुवारीला लाँच होणार आहे.
  • या दिवशी Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra स्मार्टफोन लाँच केले जातील.
  • भारतात गॅलेक्सी एस23 सीरीजची प्री-बुकिंग सुरु झाली आहे.

1 फेब्रुवारीला Galaxy Unpacked 2023 event आहे ज्याच्या मंचावरून सॅमसंग गॅलेक्सी एस23 सीरीज बाजारात सादर केली जाईल. हा सॅमसंगचा सर्वात इव्हेंट असेल ज्याच्या माध्यमातून Samsung Galaxy S23, Samsung Galaxy S23+ आणि Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात. पुढे आम्ही गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमधून येणाऱ्या गॅलेक्सी एस23 सीरीजची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि सेलची संपूर्ण माहिती दिली आहे.

Samsung Galaxy S23 series कधी होणार लाँच

Galaxy Unpacked 2023 इव्हेंटच्या मंचावरून ही नवीन फ्लॅगशिप फोन सीरीज 1 फेब्रुवारीला मार्केटमध्ये एंट्री करेल. हा लाँच इव्हेंट अमेरिकेतील सॅन फ्रांसिस्कोमध्ये आयोजित केला जाईल. स्थानिक वेळेनुसार गॅलेक्सी अनपॅक्ड 1 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता सुरु होईल जो भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. भारतीय वेळेनुसार हा इव्हेंट रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सर्व सॅमसंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह पाहता येईल.

भारतात कशी करता येईल गॅलेक्सी एस23 सीरीजची प्री-बुकिंग

Samsung Galaxy S23 series खरेदी करण्याचा विचार करणारे मोबाइल युजर्स 1,999 रुपये देऊन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर फोन प्री-रिजर्व करू शकतात. खरेदीच्या वेळी हे पैसे फोनच्या किंमतीत अ‍ॅडजस्ट केले जातील. रिजर्वेशन केल्यावर 6,999 रुपयांचे samsung.com कुपन आणि 5,000 रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट ग्राहकांना मिळतील. Samsung Shop App वर 2000 रुपयांचे वेलकम व्हाउचर आणि 2% लॉयल्टी पॉईंट देखील मिळतील. अशाप्रकारे 5,000 रुपयांचा Amazon Pay cashback देखील दिला जाईल.

Samsung Galaxy S23 Price

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस23 स्मार्टफोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मिळेल ज्याची किंमत $799 डॉलर असू शकते. तसेच मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो आणि ज्याची प्राइस $849 डॉलर असू शकते. भारतीय करंसीनुसार ही किंमत अनुक्रमे 64,900 रुपये आणि 69,000 रुपयांच्या आसपास आहे. हे देखील वाचा: शाहरुख खानचा ‘पठाण’ पाहताना दिसली POCO X5 Pro लाँच डेट; पुढील आठवड्यात येणार दणकट फोन

Samsung Galaxy S23+ Price

गॅलेक्सी ए23+ पाहता लीकनुसार, या फोनचे मेमरी व्हेरिएंट्स देखील वनीला मॉडेल सारखे असू शकतात. फोनचा 8GB RAM + 128 GB storage व्हेरिएंट $999 डॉलर मध्ये तर 8GB RAM + 256GB storage व्हेरिएंट $1049 डॉलर मध्ये लाँच होऊ शकतो. ही प्राइस जवळपास 81,000 रुपये आणि 85,000 रुपये आहे.

Samsung Galaxy S23 Ultra Price

सीरीजचा सर्वात मोठा अल्ट्रा मॉडेल तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. किंमत पाहता 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट $1,249 डॉलर (जवळपास 1,01,499 रुपये), 12जीबी रॅम+ 512जीबी स्टोरेज व्हेरिएंट $1349 (जवळपास 1,09,499 रुपये) आणि 12जीबी रॅम + 1टीबी स्टोेरेज व्हेरिएंट $1499 (जवळपास 1,21,800 रुपये) मध्ये लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy S23 Specifications

सॅमसंग गॅलेक्सी एस23 हा मोबाइल फोन 6.1 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेली असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकते. प्रोसेसिंगसाठी या सॅमसंग फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट असल्याचं रिपोर्ट्स व लीक्समधून समोर आलं आहे. Samsung Galaxy S23 चा 8जीबी रॅम व्हेरिएंट समोर आला आहे जोडीला 128जीबी व 256जीबी स्टोरेज दिली जाईल.

Samsung Galaxy S23 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. या फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 12 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सर आणि 10 मेगापिक्सलचा थर्ड लेन्स मिळू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस23 10 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह येऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 3,900एमएएचची बॅटरी असल्याचं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे.

Samsung Galaxy S23 Ultra Specifications

हा मोबाइल फोन 1440 x 3088 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या स्क्रीनसह लाँच होईल जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये 3.36गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच हा स्मार्टफोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 1टीबी पर्यंतच्या स्टोरेजसह लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: एकदा चार्ज केल्यावर 150 किलोमीटर धावणारी भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर; सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा

Samsung Galaxy S23 Ultra मध्ये फोटोग्राफीसाठी 200 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो, जोडीला 108 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सलचे सेन्सर असू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हा सॅमसंग फोन 4,885एमएएच बॅटरीसह बाजारात येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here