लॉन्च झाला सर्वात अनोखा स्मार्टफोन ओपो फाइंड एक्स, इनविजिबल आहेत 8जीबी रॅम वाल्या या फोनचे तिन्ही कॅमेरा

स्मार्टफोन मधील तंत्रज्ञान एक पाऊल पुढे नेत काही दिवसांपूर्वी वीवो ने आपला फ्लॅगशिप फोन वीवो नेक्स लॉन्च केला होता. या फोन मध्ये फ्रंट कॅमेरा फोन बॉडी च्या आत देण्यात आला आहे जो सेल्फी ची कमांड दिल्यावर बाहेर येतो. तसेच ही टेक्निक अजून एडवांस करत ओपो ने आपले पाऊल टाकले आहे. ओपो ने आज अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला नवीन फ्लॅगशिप फोन फाइंड एक्स लॉन्च केला आहे. या फोन मध्ये रियर आणि फ्रंट कॅमेरा सेटअप दोन्ही फोन च्या बॉडी च्या आत देण्यात आले आहेत जे कॅमेरा अॅप उघडताच बाहेर येतात आणि फोटो क्लिक करतात.

ओपो फाइंड एक्स ची सर्वात मोठी खासियत याचा कॅमेरा सेटअप आहे. या फोन मध्ये रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही फोन च्या बॉडी च्या आत ठेवण्यात आले आहेत जे बाहेरून दिसत नाहीत. फोटो घेण्यासाठी कॅमेरा अॅप ओपन होताच फोन बॉडी मधून कॅमेरा सेंसर बाहेर निघतात आणि फोटो कॅप्चर करतात.

जोपर्यंत फोटो काढण्याची कमांड दिली जात नाही हे कॅमेरा सेटअप पूर्णपणे अदृश्य असतात. बॉडी च्या आत असल्यामुळे फोन फ्रंट आणि बॅक पॅनल वरून पूर्णपणे स्मूथ आहे म्हणजे यावर कोणताही स्लॉट किंवा सेंसर होल नाही.

ओपो फाइंड एक्स चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 92.25 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो देण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर फक्त खालच्या बाजूला बारीक बेजल आहे पण इतर तिन किनारे पूर्णपणे स्क्रीनला स्पर्श करत आहेत.

हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे त्याचबरोबर हा क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 630जीपीयू आहे.

कंपनी ने या फोन मध्ये 8जीबी रॅम तसेच 256जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच यात 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. या फोन मध्ये 3डी फेस अनलॉक टेक्निक आहे.

4जी सह हा फोन 5जी कनेक्टिविटी क्षमते सह लॉन्च करण्यात आला आहे. ओपो चा हा शानदार स्मार्टफोन आगामी 12 जुलैला भारतीय बाजारात सादर केला जाईल. देशात फोन ची किंमत काय असेल यासाठी 12 जुलै ची वाट बघावी लागेल.

सौजन्य : theverge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here