6GB रॅम असलेल्या Nokia 5.3 च्या किंमतीत झाली मोठी कपात, अशी आहे नवीन किंमत

नोकियाने गेल्या वर्षी भारतीय मार्केट मध्ये आपली जागा बनवण्यासाठी अनेक स्मार्टफोन्स सादर केले होते, त्यात Nokia 5.3 चा पण समावेश होता. हा फोन कंपनीने ऑगस्ट मध्ये भारतीय बाजारात लॉन्च केला होता. आता नोकियाचे फोन बनवणारी कंपनी HMD Global ने देशात नोकिया 5.3 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. जर तुम्ही एक नॉन-चायनीज फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर Nokia 5.3 विकत घेण्याची हि चांगली संधी आहे. आता हा फोन 1,000 रुपये डिस्काउंट सह विकत घेता येईल.

नवीन किंमत

नोकिया 5.3 चा 4 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरियंट आता 13,999 रुपयांच्या ऐवजी 12,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर, 6 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरिएंट 15,499 रुपयांच्या ऐवजी 14,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कंपनीने आपल्या ऑफिशियल साइट वर डिवाइसची किंमत लिस्ट केली आहे. फोन स्यान, सॅंड आणि चारकोल कलर विकत घेता येईल.

हे देखील वाचा : 3,900mAh बॅटरी सह लिस्ट झाला Nokia चा स्वस्त फोन, जाणून घ्या कधी करेल एंट्री

स्पेसिफिकेशन्स

नोकिया 5.3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 6.55 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह येतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. Nokia 5.3 एंडरॉयड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये 4 जीबी व 6 जीबी रॅमचा समावेश आहे. तसेच फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : Nokia चे दोन नवीन फोन आले समोर, एकामध्ये 5,000एमएएच तर दुसऱ्यात असेल 4,500एमएएचची बॅटरी

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 5.3 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो या सेटअप मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 5.3 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 5.3 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया 5.3 व्हिडीओ

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here